Pakistan Team 7 Changes vs ENG 3rd Test : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना सुरू होण्यापूर्वीच बोर्डाने तब्बल 7 खेळाडूंना संघातून काढून त्यांच्या जागी 7 नव्या खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही, तर मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षकांनाही पदावरून हटवण्यात आलं आहे.

Continues below advertisement

पाकिस्तानला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. लीड्समध्ये पाकिस्तानचा एका डावाने पराभव झाला, तर लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने चौथ्याच दिवशी विजय मिळवला. या खराब कामगिरीनंतर PCBने संघाच्या रचनेतच मोठे बदल केले आहेत.

7 खेळाडूंना संघातून डच्चू

Continues below advertisement

पीसीबीने मोहम्मद रिझवान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, अली उस्मान, आमिर जमाल, मोहम्मद अवैस जफर आणि खुर्रम शहजाद यांना संघातून मुक्त केलं आहे. त्यांच्या जागी साईम अयुब, अब्दुल्ला फजल, अराफत मिन्हास, साद बेग, मोहम्मद रंधावा, रझाउल्लाह आणि मोहम्मद इम्रान ज्युनियर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. यापैकी पाच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे. मात्र, मोहम्मद रंधावा आणि रझाउल्लाह यांनी अद्याप पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलेलं नाही. हे सर्व खेळाडू बर्मिंगहॅममध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी संघासोबत जोडले जातील.

प्रशिक्षकांवरही PCBची कारवाई 

केवळ खेळाडूंमध्येच बदल न करता पीसीबीने कोचिंग स्टाफमध्येही मोठे फेरबदल केले आहेत. मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी अनुक्रमे माईक हेसन आणि ॲश्ले नॉफके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनी अक्षरशः निराशा केली आहे. संघाला आतापर्यंतच्या चार डावांपैकी एकाही डावात 150 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. त्यामुळे फलंदाजीच्या अपयशाचा फटका पाकिस्तानला बसला आहे.

आता मालिकेतील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना 9 सप्टेंबरपासून बर्मिंगहॅममध्ये खेळवला जाणार आहे. मालिकेत पाकिस्तान 0-2 ने पिछाडीवर असून, या सामन्यात प्रतिष्ठा वाचवण्यासाठी संघाला मैदानात उतरावं लागणार आहे.

बर्मिंगहॅम कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ -

बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला फजल, अराफत मिन्हास, अझान अवैस, मोहम्मद अब्बास, मोहम्मद अली, मोहम्मद इम्रान, मोहम्मद इम्रान ज्युनियर, मोहम्मद गाझी घोरी, रझाउल्लाह, साद बेग (यष्टीरक्षक), सैम अयुब, साजिद खान, सौद शकील, शान मसूद आणि उबैद शाह.

हे ही वाचा -

Vaibhav Suryavanshi Bowling : वैभव सूर्यवंशीच्या बॉलिंग अॅक्शनवर युवराज सिंगची भन्नाट कमेंट, म्हणाला, माझ्या अॅक्शन....