PSL 2026 5 Major Controversies In Marathi News : पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2026 चा हंगाम अनेक वादांनी गाजत आहे. जवळपास दररोज काही ना काही नवीन प्रकरण समोर येत असून, त्यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा खराब होत असल्याची चर्चा आहे. बॉलचा रंग बदलण्यापासून ते बॉल टेंपरिंगसारख्या गंभीर प्रकारांपर्यंत अनेक वाद घडले. चला, पाकिस्तान सुपर लीग 2026 मधील पाकिस्तानला लाजिरवाण्या ठरलेल्या पाच मोठ्या वादांवर नजर टाकूया.

PSL सोडून खेळाडूंनी IPL ला पसंती

पाकिस्तान सुपर लीग सुरू होताच मोठा वाद उभा राहिला, जेव्हा अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी पीएसएलसोडून आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. ब्लेसिंग मुझाराबानी हे पहिले नाव चर्चेत आले. त्यानंतर दासुन शनाका, स्पेन्सर जॉन्सन आणि गुडाकेश मोती यांनीही पीएसएलमधून माघार घेत आयपीएलमध्ये सहभाग घेतला. या निर्णयामुळे पीएसएलच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

सामन्यात बॉलचा रंग बदलला

पीएसएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. लाहोर कलंदर आणि हैदराबाद किंग्समन यांच्यातील सामन्यात दुसऱ्याच षटकात जर्सीचा रंग बॉलवर लागला आणि पांढरा चेंडू लालसर झाला. या घटनेमुळे खेळाडू आणि प्रेक्षक दोघेही आश्चर्यचकित झाले आणि लीगची खिल्ली उडाली.

बॉल टेंपरिंगचा प्रकार

पाकिस्तान सुपर लीगमध्ये बॉल टेंपरिंगचा गंभीर आरोपही समोर आला. फखर जमान याने शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफच्या मदतीने हा प्रकार केल्याचे सिद्ध झाले. यानंतर फखर जमान यांच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली. या घटनेमुळे पीएसएलची प्रतिमा आणखी खराब झाली.

मुख्यमंत्रीवर आक्षेपार्ह टिप्पणी

नसीम शाह यांनी सोशल मीडियावर मरियम नवाज यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली. “यांना लॉर्ड्सच्या क्वीनसारखा सन्मान का दिला जातो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणामुळे त्यांच्यावर सुमारे 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आणि सार्वजनिक माफी मागावी लागली.

खेळाडूवर बंदी आणि कायदेशीर वाद

ब्लेसिंग मुझाराबानी यांनी पीएसएल सोडून आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यावर पाकिस्तानकडून कायदेशीर कारवाई करण्यात आली आणि दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. मात्र मुजारबानी यांनी हा निर्णय आव्हान देत सांगितले की त्यांनी कोणताही अधिकृत करार साइन केलेला नव्हता. त्यामुळे हा वाद अधिकच चिघळला.

हे ही वाचा -

LSG vs DC Live Score IPL 2026 : रोहित शर्मा OUT? गुजरात आणि मुंबई संघांची अशी असू शकते प्लेइंग-11, जाणून घ्या LIVE अपडेट्स