एक्स्प्लोर

IND Vs PAK Asian Games 2026 Final : संपूर्ण पाकिस्तान संघ मान झुकवून उभा राहिला, जेव्हा स्टेडियममध्ये वाजलं भारताचं राष्ट्रगीत, पोडियमवर 'त्या' मिनिटाला काय घडलं? पाहा VIDEO

Pakistan Players Stands Indian National Anthem Asian Games : भारताने क्रिकेटच्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 19 धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर नाव कोरलं.

IND Vs PAK Asian Games 2026 Final : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताने क्रिकेटच्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 19 धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर नाव कोरलं. कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये रंगलेल्या या हायव्होल्टेज सामन्यानंतर पदक वितरण सोहळ्यातही भारत-पाकिस्तान सामन्याची चर्चा कायम राहिली. भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 बाद 211 धावांचा डोंगर उभा केला. अभिषेक शर्माने अवघ्या 28 चेंडूत 61 धावांची आक्रमक खेळी केली, तर तिलक वर्माने 22 चेंडूत नाबाद 51 धावा करत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 20 षटकांत 6 बाद 192 धावाच करता आल्या. हसन नवाजने 96 धावांची झुंजार खेळी केली, मात्र त्याचा प्रयत्न पाकिस्तानला विजय मिळवून देऊ शकला नाही.

पदक मंचावर भारताचा तिरंगा, पाकिस्तान रौप्यपदकासह

विजयानंतर झालेल्या पदक वितरण सोहळ्यात भारताला सुवर्ण, तर पाकिस्तानला रौप्यपदक मिळाले. भारतीय संघ सुवर्णपदक स्वीकारण्यासाठी मंचावर उभा असताना ‘जन गण मन’ वाजवण्यात आलं. त्यावेळी पाकिस्तानचा रौप्यपदक विजेता संघही राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ सावधान स्थितीत उभा असल्याचं पाहिला मिळाले. या क्षणाचे दृश्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. भारताचा तिरंगा उंचावलेला असताना राष्ट्रगीताची धून वाजत होती आणि भारतीय खेळाडू सुवर्णपदकाचा आनंद साजरा करत होते.

मोहसिन नक्वी मात्र सोहळ्यात उपस्थित नव्हते

भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यापूर्वी एसीसी आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी पदक वितरण सोहळ्यात उपस्थित राहणार का, याबाबत मोठी चर्चा होती. मात्र एशियन क्रिकेट कौन्सिलने स्पष्ट केलं होतं की, पूर्वनियोजित व्यस्ततेमुळे नक्वी फायनल डे आणि सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत कोणताही पदक वितरणाचा प्रसंग घडला नाही. पदक वितरणाच्या वेळी आयसीसी अध्यक्ष जय शाह उपस्थित होते. भारताच्या खेळाडूंना सुवर्णपदक प्रदान करण्याच्या सोहळ्यात ते सहभागी झाले होते.

क्रिकेटमध्ये भारताचं ‘डबल गोल्ड’

2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत सुवर्णपदक जिंकलं. महिला संघाने यापूर्वी श्रीलंकेचा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं होतं. पुरुष संघाने पाकिस्तानला हरवत त्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली. त्यामुळे भारताने क्रिकेटमध्ये डबल गोल्डची कामगिरी केली. भारतासाठी हा विजय विशेष ठरला, कारण पुरुष क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपलं सुवर्णपदक यशस्वीपणे राखलं. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात 19 धावांनी मिळवलेल्या या विजयामुळे भारताच्या पदक खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली.

हे ही वाचा -

IND vs WI 3rd ODI : आधी गिलने विकेट फेकली, नंतर कोहली शून्यावर क्लीन बोल्ड! वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या 16 चेंडूंत नको ते घडलं, मैदानात सन्नाटा 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
Ind vs NZ T20 Series: भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
IND vs WI 1st T20 : श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
IND vs WI 1st T20I Score : टीम इंडियाचा 8 विकेट्सनी दणदणीत विजय
टीम इंडियाचा 8 विकेट्सनी दणदणीत विजय
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget