WTC Points Table Pakistan Move to Bottom : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर झालेल्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा एक डाव आणि 103 धावांनी धुव्वा उडवत तीन दिवसांतच सामना खिशात घातला. या पराभवामुळे पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढल्या असून, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या पॉइंट्स टेबलमध्ये पाकिस्तानची घसरण थेट तळाच्या स्थानावर झाली आहे. कर्णधार म्हणून जो रूटच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात इंग्लंडसाठी शानदार विजयाने झाली. 

Continues below advertisement

हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडने सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाकिस्तानवर वर्चस्व गाजवलं. पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या 171 धावांत आटोपला आणि यामुळे इंग्लंडला सामन्यावर पकड मिळवण्याची मोठी संधी मिळाली. इंग्लंडच्या फलंदाजांनी या संधीचं सोनं केलं. संघाच्या चार फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. मोठी धावसंख्या उभारल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी उर्वरित काम पूर्ण केलं.

पाकिस्तानच्या दुसऱ्या डावातही फलंदाजांची अवस्था काही वेगळी नव्हती. ओली रॉबिन्सन, जोश टंग आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी तीन विकेट घेत पाकिस्तानच्या फलंदाजीची कंबर मोडली. पाकिस्तानचा दुसरा डाव अवघ्या 135 धावांवर संपुष्टात आला आणि इंग्लंडने एक डाव व 103 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

Continues below advertisement

WTC पॉइंट्स टेबलमध्ये पाकिस्तानची घसरण

या पराभवाचा पाकिस्तानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे. चॅम्पियनशिपच्या या सायकलमध्ये पाकिस्तानचा हा आणखी एक पराभव असून, सात सामन्यांनंतर त्यांच्या खात्यात केवळ 16 गुण आहेत. त्यांचा पीसीटी 19.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. या खराब कामगिरीमुळे पाकिस्तान डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर घसरला आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानसाठी फायनलच्या शर्यतीत पुनरागमन करण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे.

इंग्लंडलाही फारसा फायदा नाही

दुसरीकडे, लीड्स कसोटीत पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यानंतरही इंग्लंडच्या डब्ल्यूटीसी क्रमवारीत मोठा बदल झालेला नाही. शानदार विजय मिळवल्यानंतरही इंग्लंड सातव्या स्थानावर कायम आहे.

ऑस्ट्रेलिया अव्वल, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी

डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. 77.78 टक्के पीसीटीसह ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका 75 टक्के पीसीटीसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोर आता मोठं आव्हान उभं राहिलं आहे. मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमध्ये त्यांना केवळ विजय मिळवण्याची गरज नाही, तर आपल्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये मोठी सुधारणा करावी लागणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 प्वाइंट्स टेबल

ऑस्ट्रेलिया : 9 सामने, 7 विजय (पीसीटी- 77.78)दक्षिण आफ्रिका : 4 सामने, 3 विजय (पीसीटी- 75.00)न्यूझीलंड : 6 सामने, 4 विजय (पीसीटी- 72.22)बांगलादेश : 5 सामने, 3 विजय (पीसीटी- 66.67)भारत : 10 सामने, 5 विजय (पीसीटी- 53.33)श्रीलंका : 5 सामने, 1 विजय (पीसीटी- 33.33)इंग्लंड : 14 सामने, 5 विजय (पीसीटी- 29.76)वेस्ट इंडीज : 12 सामने, 2 विजय (पीसीटी- 20.83)पाकिस्तान : 7 सामने, 2 विजय (पीसीटी- 19.05)

हे ही वाचा -

IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI