एक्स्प्लोर

Pakistan Eliminated Women's T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कपमध्ये उलटफेर! 124 धावांच्या साध्या आव्हानासमोर पाकिस्तानचे डोळे फिरले, थेट स्पर्धेतून OUT

Pakistan eliminated from Women's T20 World Cup 2026 : महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये बांगलादेशने कमालीची कामगिरी करत पाकिस्तानला 23 धावांनी धूळ चारली आहे.

Pakistan Women vs Bangladesh Women ICC Women's T20 World Cup 2026 : महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये बांगलादेशने कमालीची कामगिरी करत पाकिस्तानला 23 धावांनी धूळ चारली आहे. रोज बाउल मैदानावर झालेल्या या रोमहर्षक सामन्यात बांगलादेशने दिलेल्या 124 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अवघ्या 100 धावांवर आटोपला. या पराभवामुळे पाकिस्तानची स्पर्धेत पराभवाची हॅटट्रिक झाली आहे, तर बांगलादेशने 3 सामन्यांत दुसरा विजय नोंदवला आहे. महिला टी-20 क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशचा पाकिस्तानविरुद्धचा हा फक्त पाचवा विजय आहे. 2025 च्या विश्वचषकानंतर सलग दुसऱ्यांदा बांगलादेशने पाकिस्तानला विश्वचषकात पराभूत केले आहे.

शोर्ना अख्तरची वादळी खेळी

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशची सुरुवात अत्यंत खराब झाली. पॉवरप्लेमध्येच त्यांनी अवघ्या 24 धावांवर 3 विकेट्स गमावल्या. मात्र, कर्णधार निगार सुल्ताना आणि सोभना मोस्तरी (22 धावा) यांनी डाव सावरला. शेवटच्या षटकांमध्ये शोर्ना अख्तरने 22 चेंडूत 39 धावांची झंझावाती खेळी करत बांगलादेशला 6 बाद 123 धावांपर्यंत पोहोचवले. पाकिस्तानकडून फातिमा सनाने 18 धावांत 2, तर नश्रा संधूने 14 धावांत 1 विकेट घेतली.

पाकिस्तानी फलंदाजी पत्त्यांसारखी कोलमडली

124 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली होती. मुनिबा अली (25) आणि गुल फिरोझा (23) यांनी पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. मात्र, फिरोझा बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा डाव पत्त्यांसारखा कोलमडला. आयेशा जफर (11) आणि कर्णधार फातिमा सना (10) वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. संपूर्ण संघ 20 षटकांत 8 बाद 100 धावाच करू शकला.

बांगलादेशी गोलंदाजांची शानदार कामगिरी

बांगलादेशच्या विजयात फिरकीपटूंनी मोलाची भूमिका बजावली. संजिदा अख्तर (21 धावांत 3 बळी) आणि नाहिदा अख्तर (18 धावांत 3 बळी) यांनी भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. राबिया खान आणि रितू मोनी यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत त्यांना उत्तम साथ दिली.

सलग तिसरा मानहानिकारक पराभव

पाकिस्तानला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे पाकिस्तानचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले आणि संघ स्पर्धेतून बाहेर पडला. दरम्यान, बांगलादेशने आपला दुसरा विजय मिळवून गुणतालिकेतील आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. हा संघ आता उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहे. विशेष म्हणजे, बांगलादेशने टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच एकाच हंगामात दोन सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

हे ही वाचा -

Vaibhav Sooryavanshi : संपूर्ण मालिकेत पन्नाशीसाठी तरसणारा वैभव आज फायनलमध्ये श्रीलंकेचा गेम करणार?, LIVE सामना कुठे अन् कधी पाहायचा? जाणून घ्या A टू Z

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ICC :  वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत- पाकिस्तान तीन वेळा आमने सामने? आयसीसीनं फॉरमॅट बदताच क्रिकेटप्रेमींनी संभाव्य समीकरण शोधून काढलं
वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत- पाकिस्तान तीन वेळा आमने सामने? आयसीसीनं फॉरमॅट बदलताच क्रिकेटप्रेमींनी अंदाज बांधला
ICC : वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
Shubman Gill : शुभमन गिलकडे वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी, सध्या गिल दुसऱ्या स्थानी, टॉपवर कोण?
शुभमन गिल दुसऱ्या वनडेत आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचणार? कॅप्टन गिलकडे मोठी संधी
Team India : टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय, मालिकेत आघाडी घेऊनही भारताचं टेन्शन वाढलं, नेमकं काय घडलं?  
टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय, मालिकेत आघाडी घेऊनही भारताचं टेन्शन वाढलं, नेमकं काय घडलं?  
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget