Pakistan Cricket Team : नवऱ्याचा फोटो चुकीच्या ठिकाणी दिसला, 16 वर्षांनी लहान असलेल्या पाकिस्तानी क्रिकेटरची बायको रागाने लालेलाल; म्हणते...
Pakistan Cricket Team : ती 16 वर्षांनी लहान, पण नवऱ्याचा फोटो पाहताच रागाने लालेलाल; पाकिस्तानी क्रिकेटरची बायको म्हणते...

Pakistan Cricket Team : पाकिस्तान क्रिकेट टीम आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार देखील सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असलेले पाहायला मिळतात. चॅम्पियन्स ट्रॉफीतून पहिल्या राऊंडमध्येच बाहेर पडण्याची नामुष्की ओढावल्यानंतर पाकिस्तानच्या संघाला चारी बाजूंनी टीकेला सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियावर देखील पाकिस्तानी संघाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. दरम्यान, आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम आक्रम याची बायको चर्चेत आली आहे.
पाकिस्तानचा कर्णधार आणि दिग्गज वेगवान म्हणून ओळख असलेल्या वसीम आक्रमची पत्नी शनीरा हिने सोशल मीडियावर ट्रोलिंग करणाऱ्या अकाऊंटला चांगलचं झापलंय. शनीराने तिचा पती वसीम आक्रम याचा फोटो चुकीच्या ठिकाणी दिसल्यानंतर राग व्यक्त केलाय. तिने एका ट्रोल करणाऱ्या अकाऊंटला ट्वीटरवरुन चांगलचं झापलंय.
Hey @GemsOfCricket You guys are definitely "out of context" and from what I can see you're also out of correct and reliable information! 👏🏼 https://t.co/kn68XKh6xv
— Shaniera Akram (@iamShaniera) February 25, 2025
संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात...
ट्वीटरवर क्रिकेटमधील काही खेळाडूंचे फोटो कोलाज करत शेअर करण्यात आले होते. ‘तलाकशुदा XI’ असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं होतं. यामध्ये रवी शास्त्री, जवागल श्रीनाथ, दिनेश कार्तिक, शिखर धवन यांसारख्या खेळाडूंचा समावेश होता. तर भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याचा फोटो खाली इम्पॅक्ट प्लेअर म्हणून देण्यात आला होता. ‘आउट ऑफ कॉन्टेक्स्ट क्रिकेट’ या X हँडलला शनिराने खोटी माहिती देणारे पेज म्हणून ट्रोल केले आहे.
रागाने लाल झालेल्या शनीराने काय काय लिहिलं?
शनिराने ट्वीटमध्ये म्हटलंय की, ‘अरे @GemsOfCricket तुम्ही लोक चुकीची माहिती देत आहात.. तुमच्याकडे चुकीचे संदर्भ आहेत. मला जाणवतं आहे की, तुमच्याकडे विश्वसनीय माहिती नाही.
वसीम आक्रमपेक्षा 16 वर्षांनी लहान आहे शनिरा
पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम आक्रम यांचं पहिलं लग्न 1995 मध्ये हुमा मुफ्ती हिच्याशी झालं होतं. मात्र, दुर्दैवाने हुमाचं 2009 मध्ये चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये निधन झालं होतं. त्यानंतर 2013 मध्ये आक्रमने 16 वर्षांनी लहान असणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या जन्मी शनीरा थॉम्पसन हिच्याशी लग्न केलं. त्यांची पहिली भेट मेलबर्नमध्ये झाली होती. डिसेंबर 2014 मध्ये शनिराने एका मुलीलाही जन्म दिलाय. याशिवाय पहिल्या बायकोपासूनही वसीमला दोन अपत्य आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
न्याय अन् हक्क मिळवण्यासाठी आंदोलन करावं लागतंय, उज्ज्वल निकमांच्या नियुक्ती पंधरा दिवसा अगोदर का काढली नाही?: बजरंग सोनावणे














