एक्स्प्लोर

Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  

Pakistan Cricket Team : सतत सुरु असलेल्या पराभवामुळं पाकिस्तान क्रिकेटमध्ये जोरदार घडामोडी सुरु आहेत. आता पाकिस्ताननं टी 20 संघाचा कर्णधार बदलला आहे.  

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं पाकिस्तानच्या टी 20 संघाचा पराभव केला आहे. सातत्यानं सुरु असलेल्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा उलटफेर झाले आहेत. पाकिस्ताननं टी 20 क्रिकेट संघाचा कर्णधार बदलला आहे.श्रीलंकेविरोधातील टी 20 मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर झाला आहे. यामध्ये नव्या कर्णधाराची निवड करण्यात आली आहे. सलमान अली आगा याला कर्णधारपदावरुन हटवून साहिबजादा फरहान याला नेतृत्त्वाची संधी देण्यात आली आहे. 
 
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. श्रीलंकेविरोधातील टी 20 मालिकेसाठी साहिबजादा फरहान याला कर्णधार करण्यात आलं आहे. या निर्णयाद्वारे सलमान अली आगा याला कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं आहे. याशिवाय संघातून देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने श्रीलंकेविरोधातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. साहिबजादा फरहान याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. श्रीलंकेविरोधातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी पाकिस्ताननं 15 खेळाडूंची टीम निवडण्यात आली आहे.  

सलमान अली आगाचं कर्णधारपद काढून घेतलं

सलमान अली आगाचं कर्णधारपद काढून घेत पीसीबीनं त्याला आणखी एक धक्का दिला आहे. श्रीलंकेविरोधातील टी 20 मालिकेतून देखील सलमान अली आगाला वगळण्यात आलं आहे. मात्र, सलमान अली आगा याला वनडे संघात स्थान देण्यात आलं आहे.  

रजाउल्लाह याला पहिल्यांदा संधी

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं टी 20 संघात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. रजाउल्लाह याला पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संघात पहिल्यांदा संधी मिळाली आहे. याशिवाय हसन नवाज, नसीम शाह यांनी  टी 20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. फखर जमान, सॅम अयुब आणि शादाब खान हे पाकिस्तानच्या संघाचा भाग आहेत. 
 
9 ऑक्टोबरपासून टी 20 मालिका

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील 3 टी 20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. पहिली मॅच रावळपिंडीत 9 ऑक्टोबरला होणार आहे. दुसरा सामना 11 ऑक्टोबर, तिसरा सामना 13 ऑक्टोबरला होणार आहे. सर्व सामने रावळपिंडीमध्ये खेळवले जाणार आहेत.  

युवराज जाधव एबीपी माझाच्या डिजीटल टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्याकडे ८ वर्षांचा अनुभव आहे. एबीपी माझासोबत ते मार्च 2024 पासून कार्यरत आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये महाराष्ट्र टाइम्स, टीव्ही ९ मराठी, ईटीव्ही भारत या नामांकित संस्थांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातून (रानडे इन्स्टिट्यूट) मधून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात कामाला सुरुवात केली. युवराज जाधव सातारा जिल्ह्यातील असून स्थानिक स्वराज संस्थाचं राजकारण ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींबाबत लेखन करतात. याशिवाय,आंतराराष्ट्रीय घडामोडी, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसह ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांवर काम करतात.

 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Virat Kohli Record : ऑकलंडमध्ये विराट कोहलीचा ऐतिहासिक धमाका! मोडले सचिनचे 2 विक्रम, तिसऱ्या क्रमांकावर असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
ऑकलंडमध्ये विराट कोहलीचा ऐतिहासिक धमाका! मोडले सचिनचे 2 विक्रम, तिसऱ्या क्रमांकावर असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
IND vs NZ 1st ODI : पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात ट्विस्टवर ट्विस्ट, दोनदा बदललं लक्ष्य; अखेर विराट कोहलीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात ट्विस्टवर ट्विस्ट, दोनदा बदललं लक्ष्य; अखेर विराट कोहलीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय
IND vs NZ 1st ODI Score : वनडे मालिकेतही टीम इंडियाची विजयी सलामी! न्यूझीलंडचा 5 विकेट्सनं पराभव
IND vs NZ 1st ODI : वनडे मालिकेतही टीम इंडियाची विजयी सलामी! न्यूझीलंडचा 5 विकेट्सनं पराभव
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
Embed widget