Pakistani Cricketer Aamir Jamal newborn daughter passed away : पाकिस्तानचा ऑलराउंडर क्रिकेटपटू आमिर जमालवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आमिरच्या नवजात कन्येचं अकाली निधन झाल्याने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेची माहिती स्वतः आमिरने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून दिली, ज्याने चाहत्यांच्याही डोळ्यात अश्रू आणले.
आमिर जमालचा भावनिक पोस्ट
आमिरने एक्स (Twitter) वर आपल्या लाडक्या लेकराच्या हाताचा फोटो शेअर करत लिहिले की, “तु अल्लाहकडून आली आणि अल्लाहकडेच परत गेली. मी तुला जास्त वेळ सांभाळू शकलो नाही. बाबा आणि मम्मा तुला खूप मिस करतील. अल्लाह तुला जन्नतच्या सर्वोच्च स्थानावर ठेवो.” त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांसह अनेक क्रिकेटपटूंनी आणि मित्रपरिवाराने दु:ख व्यक्त केले. पाकिस्तान महिला संघाची माजी कर्णधार सना मीर हिने लिहिले की, “अल्लाह तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला हे दु:ख सहन करण्याची ताकद देवो.” आमिरचे जवळचे मित्र मन्सूर राणा, राय एम. अजलान आणि उद्योगपती हमजा नक्वी यांनीही संवेदना व्यक्त केल्या. (Aamir Jamal newborn daughter passed away)
आमिर जमालची क्रिकेट कारकीर्द (Aamir Jamal Cricket Career)
आमिर जमाल सध्या पेशावर झाल्मी संघाकडून पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये खेळतो. त्याने आतापर्यंत पाकिस्तानसाठी 8 टेस्ट, 3 वनडे आणि 6 टी20 सामने खेळले आहेत. तो शेवटचा जानेवारी 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट मालिकेत खेळला होता. सध्या तो कायदे-ए-आझम ट्रॉफीमध्ये लाहोर रिजन व्हाइट्सकडून खेळत आहे. त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये 21 विकेट घेतल्या आहेत, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये 5 विकेट, आणि फर्स्ट-क्लास क्रिकेटमधील 40 सामन्यांत तब्बल 99 विकेट्स घेतल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्याला 2025–26 हंगामासाठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून वगळले होते. त्यावेळी आमिरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले होते की, “त्यांना समजु द्या, त्यांना बोलू द्या… अल्लाह सर्व बघतो.”
हे ही वाचा -