THE DREAM WORLD CUP ENDS FOR KING KOHLI : यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीची बॅट तळपली आहे. 11 डावात विराट कोहलीने खोऱ्याने धावा वसूल केल्या आहेत. रोहित शर्माने सुरुवातीला फटकेबाजी केल्यानंतर विराट कोहलीने अँकरच्या भूमिकेत टीम इंडियाची धावसंख्या वाढवण्याचे काम यशस्वी केले. यंदाच्या विश्वचषकातच विराट कोहलीने शतकाचे अर्धशतकही पूर्ण केले. विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक धावांचा विक्रमही मोडीत काढला. एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही विराट कोहलीने आपल्या नावावर केला. त्याशिवाय विश्वचषकात सर्वाधिक 50+ स्कोर करण्याचा रेकॉर्डही विराट कोहलीने केला. 

भारतीय संघाच्या यशात विराट कोहलीचा सिंहाचा वाटा आहे. विराट कोहलीने 11 डावात तब्बल 765 धावांचा पाऊस पाडला. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीने तीन शतके ठोकली. त्याशिवाय 6 अर्धशतकेही ठोकली. विराट कोहलीने 95.63 च्या जबरदस्त सरासरीने 765 धावांचा पाऊस पाडला. विश्वचषकात विराट कोहली शानदार फॉर्मात आहे. विराट कोहलीने उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरोधात शानदार शतक ठोकले. त्याशिवाय  फायनलमध्ये संयमी अर्धशतकही ठोकले. असा पराक्रम करणारा विराट कोहली पहिलाच भारतीय फलंदाज ठरला. विराट कोहलीला यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आतापर्यंतच्या विश्वचषकाच्या इतिहासात 700 पेक्षा जास्त धावा करणारा विराट कोहली पहिलाच फलंदाज आहे. 

कोहलीच्या नावावर विराट विक्रम -

क्रिकेट वर्ल्डकपच्या (Cricket World Cup 2023) उपांत्य (Semi Final) आणि अंतिम (CWC Final) सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटचा कोहलीचा समावेश झाला आहे. विराट कोहली अशी कामगिरी करणारा जगातील सातवा आणि भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी 1979 साली इंग्लंडचा मायकेल ब्रेअरली, 1987 साली ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड बून, 1992 साली पाकिस्तानचा जावेद मियांदाद, 1996 साली श्रीलंकेचा अरविंद डी सिल्वा, 2015 साली न्यूझीलंडचा ग्रँट इलियट, 2015 साली ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ या खेळाडूंनी उपांत्य आणि अंतिम सामन्यात 50 पेक्षा जास्त धावांची खेळी साकारली. यावेळी 2023 च्या विश्वचषकात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपळली.

विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज - 

 

Player Edition Innings Runs Average 100/50
 विराट कोहली Virat Kohli 2023 11 765 95.65 3/6
सचिन तेंडुलकर Sachin Tendulkar 2003 11 673 61.18 1/6
 मॅथ्यू हेडन Matthew Hayden 2007 10 659 73.22 3/1
 रोहित शर्मा Rohit Sharma 2019 9 648 81.00 5/1
 डेविड वॉर्नर David Warner 2019 10 647 71.88 3/3
शाकीब अल हसन Shakib Al Hasan 2019 8 606 86.57 2/5
रोहित शर्मा Rohit Sharma 2023 11 597 54.27 1/3
 क्विंटन डिकॉक Quinton de Kock 2023 10 594 59.40 4/0
 केन विल्यमसन Kane Williamson 2019 9 578 82.57 2/2
 रचिन रविंद्र Rachin Ravindra 2023 10 578 64.22 3/2

 यंदाच्या वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीचा जलवा

या विश्वचषकात किंग कोहलीची बॅट चांगलीच तळपळली.  उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मोडला आणि एकदिवसीय सामन्यात 50 शतके झळकावणारा पहिला फलंदाज बनला. याशिवाय त्याने या विश्वचषकात सर्वाधिक धावाही केल्या. त्याच्या खात्यात 765 धावा जमा झाल्या आहेत. मात्र, आज कोहली अर्धशतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 63 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. या अर्धशतकासह विराट कोहली विश्वचषकाच्या इतिहासात एकाच स्पर्धेत 750 हून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. हादेखील एक विक्रमच आहे.