Australia's Kit For ODI World Cup 2023 : विश्वचषकाला अवघ्या दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक राहिलाय. प्रत्येक संघ विश्वचषकाची कसून तयारी करत आहे. विश्वचषकाआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे मालिका सुरु आहे. यादरम्यानच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने विश्वचषकासाठी जर्सी लाँच केली आहे. भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाने नुकतीच आपली नवीकोरी जर्सी लाँच केली होती. आता ऑस्ट्रेलियानेही आपली जर्सी लाँच केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्वीट करत याबाबतची माहती दिली आहे. 


विश्वचषकाआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे मालिका सुरु आहे. मोहालीमध्ये पहिला वनडे सामना सुरु आहे. त्यादरम्यान ऑस्ट्रेलियाने जर्सी लाँच केली आहे. ग्लेन मॅक्सवेल याचा नव्याकोऱ्या जर्सीमधील फोटो पोस्ट करत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माहिती दिली.  जर्सी ऑस्ट्रेलियाच्या पारंपारिक पिवळ्या रंगात ठेवण्यात आली आहे. क्रिकेट विश्वचषक २०२३ भारत असे लिहिले आहे. दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया क्रिकेटचा लोगो आहे.


 
क्रिकेटच्या महाकुंभमेळ्याला पाच ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. ऑस्टेलियाच्या अभियानाची सुरुवात  8 ऑक्टोबरपासून टीम इंडियाविरुद्ध चेन्नई येथे होणार आहे.  ऑस्ट्रेलिया विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ आहे.  ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सर्वाधिक 5 एकदिवसीय विश्वचषक जिंकले आहेत. २०१५ मध्ये झालेल्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले होते. आता पुन्हा एकदा जेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ तार झाला.


आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेला सुरुवात


आशिया चषकानंतर टीम इंडिया मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याची वनडे मालिका सुरु झाली आहे.  पहिला एकदिवसीय सामना २२ सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर रंगणार आहे. त्यानंतर २४ आणि २७ सप्टेंबर रोजी इंदौर आणि राजकोट येथे लढत होणार आहे. विश्वचषकाच्या आधी होणारी ही वनडे मालिका तयारीसाठी महत्वाची आहे. विश्वचषकापूर्वी ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरू शकते. या मालिकेद्वारे दोन्ही संघांना विश्वचषक स्पर्धेची तयारी मजबूत करायची आहे, कारण विश्वचषक या परिस्थितीत खेळला जाणार आहे.