एक्स्प्लोर

No Pakistani Players The Hundred 2026 : क्रिकेटविश्वात खळबळ; पाकिस्तानच्या स्टार खेळाडूंना 4 संघांकडून कायमचा ‘बॅन’, नेमकं काय घडलं?

No Pakistani Players The Hundred 2026 : भारताशी बिघडलेल्या संबंधांचा फटका आता पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना ‘द हंड्रेड’ स्पर्धेतही बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

No Pakistani Players The Hundred 2026 : भारताशी बिघडलेल्या संबंधांचा फटका आता पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना ‘द हंड्रेड’ स्पर्धेतही बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘द हंड्रेड’मधील चार संघांचे मालक भारतीय आहेत आणि त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंना खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. मँचेस्टर ओरिजिनल्स (Manchester Originals), ओव्हल इन्व्हिन्सिबल्स (Oval Invincibles), सदर्न ब्रेव्ह (Southern Brave) आणि नॉर्दर्न सुपरचार्जर्स (Northern Superchargers) या संघांमध्ये आता पाकिस्तानी खेळाडू दिसणार नाहीत. या चारही संघांचे मालक भारतीय उद्योगपती आहेत.

‘द हंड्रेड’ची लिलाव प्रक्रिया दोन दिवस चालणार आहे. 11 मार्च रोजी महिला खेळाडूंसाठी, तर 12 मार्च रोजी पुरुष खेळाडूंसाठी बोली लावली जाणार आहे. हा लिलाव लंडनमध्ये पार पडणार आहे. बीबीसीच्या अहवालानुसार, सुमारे 18 देशांतील जवळपास 1,000 क्रिकेटपटूंमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचाही समावेश आहे, मात्र या चार संघांकडून त्यांच्यावर बोली लावली जाणार नाही.

भारत–पाकिस्तान संबंधांचा परिणाम

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंध गेल्या काही काळापासून तणावपूर्ण आहेत. गेल्या वर्षभरात दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आयपीएलशी संबंधित कोणतीही फ्रँचायझी पाकिस्तानी खेळाडूंना आपल्या संघात स्थान देत नाही.

फक्त आयपीएलपुरतेच नाही, तर SA20 आणि CPL सारख्या इतर लीगमध्येही भारतीय मालकी असलेल्या संघांकडून पाकिस्तानी खेळाडूंना संधी दिली जात नाही. ILT20 स्पर्धेतही केवळ अमेरिकन मालकीच्या संघानेच पाकिस्तानच्या खेळाडूंना करारबद्ध केले आहे.

2026 हंड्रेड लिलावापूर्वीच निर्णय

बीबीसीच्या वृत्तानुसार, ईसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अनौपचारिकरीत्या एका खेळाडू एजंटला सांगितले की आयपीएलशी संबंधित चारही फ्रँचायझी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना करारबद्ध करण्याचा प्रयत्न करणार नाहीत.

‘द हंड्रेड’च्या विक्रीपूर्वी ईसीबीचे कार्यकारी अध्यक्ष रिचर्ड गोल्ड यांना भारतीय गुंतवणुकीनंतर पाकिस्तानी खेळाडूंना लीगमध्ये खेळण्याची संधी मिळेल का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी देशाच्या आधारावर भेदभाव होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र सध्याची परिस्थिती वेगळेच चित्र दर्शवत आहे. 

पुरुष गटातील ‘द हंड्रेड’मध्ये यापूर्वी मोहम्मद अमीर, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, शादाब खान आणि हरिस रौफ यांसारखे खेळाडू सहभागी झाले होते. आता पुढील लिलावात या खेळाडूंचे भवितव्य काय ठरणार, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा -

IND vs SA Playing 11 Super 8 : संजू सॅमसन IN, अभिषेक शर्मा OUT... सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी असणार टीम इंडियाची Playing 11

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
ICC : आयसीसीकडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तान आणि झिम्बाब्वेला किती रक्कम मिळाली?
ICC कडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तानला किती?
IPL 2026 Schedule : मोठी बातमी, आयपीएलचं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
IPL चं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget