एक्स्प्लोर

Netherland Plan Abhishek Sharma : काहीही करा, त्याला बोलवा, नेदरलँड्सची मागणी अन् ‘डुप्लिकेट अभिषेक’मुळे जगातील नंबर-1 स्टार खेळाडूचा गेम, टीम इंडियाविरुद्ध काय घडलं?

Abhishek Sharma Netherland Plan : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज अभिषेक शर्मासाठी स्पर्धेची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली.

Netherland plan for Abhishek Sharma : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज अभिषेक शर्मासाठी स्पर्धेची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली. आपल्या पहिल्याच टी-20 विश्वचषकात तो अजूनपर्यंत एकही धाव करू शकलेला नाही. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातही तो शून्यावर बाद झाला. सलग तिसऱ्यांदा त्याला डकचा सामना करावा लागला आहे. मात्र, हे केवळ योगायोग नव्हता. नेदरलँड्सने यासाठी अत्यंत बारकाईने आणि नियोजनबद्ध तयारी केली होती.

नेदरलँड्स संघव्यवस्थापनाची अचूक रणनीती

नेदरलँड्सच्या संघव्यवस्थापनाने गुजरात क्रिकेट असोसिएशनकडे सरावासाठी डावखुऱ्या फलंदाजाची मागणी केली. त्यांच्या संघात एक पण डावखुऱ्या फलंदाज नसल्याने त्यांनी सुमारे 100 किलोमीटर दूर सराव करत असलेल्या मनन हिंगराजिया याला बोलावून घेतले. नेट सरावादरम्यान प्रशिक्षकांनी मननला स्पष्ट सूचना दिल्या, “तू अभिषेक शर्मासारखेच खेळायचे. जणू काही तू त्याचा डुप्लिकेट आहेस. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कर.”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vikram Sathaye (@vikramsathaye)

यानंतर उजव्या हाताचा ऑफ-ब्रेक गोलंदाज आर्यन दत्त याच्याकडे चेंडू सोपवण्यात आला. त्याने मननसमोर गोलंदाजीचा सराव केला. या नियोजनाचा फायदा सामन्यात स्पष्ट दिसून आला. अभिषेक दोन चेंडू खेळल्यानंतर तिसऱ्याच चेंडूवर बोल्ड झाला.

तीन चेंडूमध्ये खेळ खल्लास....

पहिला चेंडू : भारतीय डावाची सुरुवात करताना अभिषेक स्ट्राईकवर होता. त्याच्यासमोर ऑफ-ब्रेक गोलंदाज आर्यन दत्त होता. पहिला चेंडू अभिषेकने कव्हरच्या दिशेने खेळला, मात्र धाव मिळाली नाही.

दुसरा चेंडू : दुसरा चेंडू अभिषेकने मागे सरकत कव्हर-पॉइंटकडे फटका मारला, पण पुन्हा धाव निघाली नाही.

तिसरा चेंडू : तिसऱ्या चेंडूवर अभिषेक पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात गेला, मात्र चेंडू त्याच्या बॅटला चुकवत थेट स्टंप्सवर जाऊन आदळला. अशा प्रकारे भारताने शून्यावर पहिला विकेट गमावला. अभिषेकची ही सलग तिसरी डक ठरली. नेदरलँड्सच्या अचूक नियोजनाने आणि आर्यन दत्तच्या शिस्तबद्ध गोलंदाजीने अभिषेक शर्मा पूर्णपणे जाळ्यात अडकला, हे या प्रसंगातून स्पष्ट झाले.

अभिषेक शर्माच्या नावे 'काळा' रेकॉर्ड  

टी-20 विश्वचषकातील कारकिर्दीच्या पहिल्या तीन डावांत 0 वर बाद होण्याची नकोशी हॅट्ट्रिक अभिषेकने केली आहे. त्याच्याआधी हा विक्रम आशीष नेहराच्या नावावर होता. नेहरा आपल्या टी-20 विश्वचषक कारकिर्दीतील पहिल्या दोन डावांत शून्यावर बाद झाला होता आणि त्याला स्पर्धेत एकही धाव करता आली नव्हती. मात्र अभिषेकने हा नकोसा विक्रम आणखी पुढे नेत तीन सलग शून्यांची नोंद केली आहे.

हे ही वाचा -

India vs Pakistan Semi-Final Scenario : सुपर-8 चं गणित सुटलं, आता भारत-पाकिस्तान सेमीफायनलमध्ये भिडणार?, संपूर्ण समीकरण एका क्लिकवर...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India won T20 World Cup : सलग दुसऱ्यांदा भारतानं कोरलं T20 च्या विश्वचषकावर नाव, संघाला नेमकं किती मिळालं बक्षीस 
India won T20 World Cup : सलग दुसऱ्यांदा भारतानं कोरलं T20 च्या विश्वचषकावर नाव, संघाला नेमकं किती मिळालं बक्षीस 
T20 World Cup 2026 Team India Celebration : विजयी ट्रॉफी उचलताच टीम इंडियाचे भन्नाट सेलीब्रेशन, सूर्याने नेमकं काय केलं?, पाहा संपूर्ण Video
विजयी ट्रॉफी उचलताच टीम इंडियाचे भन्नाट सेलीब्रेशन, सूर्याने नेमकं काय केलं?, पाहा संपूर्ण Video
पुन्हा एकदा चॅम्पियन! अहमदाबादमध्ये मिळालेला विजय हा अभूतपूर्व, विराट कोहलीकडून खास शब्दात भारतीय संघाचं कौतुक
पुन्हा एकदा चॅम्पियन! अहमदाबादमध्ये मिळालेला विजय हा अभूतपूर्व, विराट कोहलीकडून खास शब्दात भारतीय संघाचं कौतुक
Abhishek Sharma Ind vs Nz : स्वतःवर विश्वास उरला नव्हता, पण... वर्ल्डकप जिंकताच अभिषेक शर्मा मनातलं सगळं बोलला; गौतम गंभीरबाबत मोठा खुलासा
स्वतःवर विश्वास उरला नव्हता, पण... वर्ल्डकप जिंकताच अभिषेक शर्मा मनातलं सगळं बोलला; गौतम गंभीरबाबत मोठा खुलासा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget