एक्स्प्लोर

Abhishek Sharma : तीन सामन्यात भोपळा, सुपर-8 आधी...; नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचा अभिषेक शर्मासाठी खास मेसेज

Nasser Hussain Given Advice To Abhishek Sharma : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माचा खराब फॉर्म आता चिंतेचा विषय ठरू लागला आहे.

Abhishek Sharma T20 World Cup 2026 News : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर आणि जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज अभिषेक शर्माचा खराब फॉर्म आता चिंतेचा विषय ठरू लागला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातही अभिषेकला खाते उघडता आले नाही. या स्पर्धेत त्याचा हा सलग तिसरा गोल्डन डक ठरला आहे.

विश्वचषक सुरू होताच त्याचा फॉर्म पूर्णपणे खालावल्याने भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला. ज्या खेळाडूकडून दमदार सुरुवातीची अपेक्षा होती, त्याचाच बॅट शांत राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नासिर हुसेन यांचा सल्ला 

नेदरलँड्सविरुद्ध अभिषेकने फक्त तीन चेंडूचा सामना केला आणि तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो क्लीन बोल्ड झाला. त्याच्या या कामगिरीनंतर इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. हुसेन यांच्या मते, सलग तीन वेळा शून्यावर बाद होणे ही केवळ तांत्रिक चूक नसून मानसिक दबावाची लक्षणे आहेत. 

त्यांनी म्हटले की, “सलग तीन डक कोणत्याही फलंदाजाला मानसिकदृष्ट्या खचतो. 10-20 धावा करून बाद होणे वेगळे, पण सतत शून्यावर बाद होणे हा मोठा धक्का असतो. अभिषेकसारख्या दर्जेदार खेळाडूसाठी हा मोठा धक्का आहे.”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

जुने व्हिडिओ पाहा, आत्मविश्वास परत मिळवा...

नासिर हुसेन यांनी अभिषेकला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी एक साधा पण प्रभावी उपाय सुचवला आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) शी संवाद साधताना सांगितले, “अभिषेकने पुढील काही दिवस स्वतःच्या फलंदाजीचे व्हिडिओ पाहावेत. आपल्या विश्लेषकाला त्याच्या उत्कृष्ट खेळींचे क्लिप्स पाठवायला सांगावे. दोन दिवस बंद खोलीत फक्त तेच पाहावे आणि स्वतःला आठवण करून द्यावी की तो किती मोठा हिटर आणि दर्जेदार फलंदाज आहे. त्यामुळे त्याचे मन सकारात्मकतेकडे वळेल.”

मागील 6 टी-20 डावांत अभिषेक 4 वेळा शून्यावर बाद

अभिषेकसाठी हा पहिलाच टी-20 विश्वचषक आहे, पण सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली. यूएसएविरुद्ध तो गोल्डन डकचा बळी ठरला. पाकिस्तानविरुद्ध चार चेंडू खेळूनही त्याला धाव करता आली नाही. आता नेदरलँड्सविरुद्ध तिसऱ्याच चेंडूवर तो शून्यावर बाद झाला आणि त्याच्या नावावर शून्यांची हॅट्ट्रिक जमा झाली. ही खराब मालिका फक्त विश्वचषकापुरती मर्यादित नाही. मागील सहा टी-20 डावांत अभिषेक चार वेळा शून्यावर बाद झाला आहे. या सहा डावांत त्याने केवळ एका अर्धशतकासह एकूण 98 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याची कामगिरी चिंतेचा विषय ठरत आहे. संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांना आता त्याच्याकडून दमदार पुनरागमनाची अपेक्षा आहे.

हे ही वाचा -

T20 World Cup 2026 Semi-Final Predictions : झिम्बाब्वे सेमीफायनलमध्ये, पाकिस्तान अन् दक्षिण आफ्रिका OUT, टीम इंडिया...? दिग्गजाची मोठी भविष्यवाणी

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, टीम इंडियानं पाळला क्षण; सरावाची वेळ बदलली, चर्चा तर होणारच
सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, टीम इंडियानं पाळला क्षण; सरावाची वेळ बदलली, चर्चा तर होणारच
IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026: अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग OUT, मोहम्मद सिराज IN...; इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
अभिषेक, अर्शदीप OUT, मोहम्मद सिराज IN...; इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी अशी असेल भारताची Playing XI
Sanju Samson : कसा आहेस, दु:खी होऊ नको भावा,मोठी स्पर्धा आहे, संधी कधीही मिळू शकते..रोहित शर्मानं संजूला दिलेला सल्ला, ICC कडून व्हिडीओ शेअर
कसा आहेस, दु:खी होऊ नको भावा,मोठी स्पर्धा आहे, संधी कधीही मिळू शकते..रोहित शर्मानं संजूला दिलेला सल्ला
IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026: इंग्लंडचे 5 खेळाडू धोकादायक, टीम इंडियाचं टेन्शन वाढणार; वानखेडेवर हाय-व्होल्टेज सेमीफायनल
इंग्लंडचे 5 खेळाडू धोकादायक, टीम इंडियाचं टेन्शन वाढणार; वानखेडेवर हाय-व्होल्टेज सेमीफायनल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jay Pawar on Ajit Pawar : झोपा काढणाऱ्या पायलटवर कारवाई कधी होणार? Special Report
Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Rajya Sabha Candidate List : भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
Team India: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, टीम इंडियानं पाळला क्षण; सरावाची वेळ बदलली, चर्चा तर होणारच
सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, टीम इंडियानं पाळला क्षण; सरावाची वेळ बदलली, चर्चा तर होणारच
Iran Israel War : इराण वि. इस्त्रायल-अमेरिका! पाकिस्तान इराणसोबत, तर इटलीच्या मेलोनींचीही स्पष्ट भूमिका; कोण कुणाच्या बाजूने? 
इराण वि. इस्त्रायल-अमेरिका! पाकिस्तान इराणसोबत, तर इटलीच्या मेलोनींचीही स्पष्ट भूमिका; कोण कुणाच्या बाजूने? 
मराठवाड्याच्या दाजींची नाद खुळा धुळवड, फुटले रंगांचे सिलेंडर; सदाबहार गाण्यांवर धरला ठेका, पाहा फोटो
मराठवाड्याच्या दाजींची नाद खुळा धुळवड, फुटले रंगांचे सिलेंडर; सदाबहार गाण्यांवर धरला ठेका, पाहा फोटो
Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना कृषी साहित्य खरेदी आणि इतर प्रकरणात दिलासा, पोस्ट करत म्हणाले, आपल्याला न्याय मिळाला म्हणून इतरांना हिणवू नका...
आपल्यापैकी अनेकांच्या भावनिक व अविचारी कृतीमुळं आपल्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्या बळ मिळतं, संयम महत्त्वाचा: धनंजय मुंडे 
EPFO : ईपीएफओ स्वत:हून 1.33 लाख खातेदारांच्या बँक खात्यात पैसे पाठवणार, पायलट प्रोजेक्टला मंजुरी, 1000 रुपयांपर्यंतची रक्कम खात्यात येणार
ईपीएफओ स्वत:हून 1.33 लाख खातेदारांच्या बँक खात्यात पैसे पाठवणार, पायलट प्रोजेक्टला मंजुरी, खात्यात 1000 रुपयांपर्यंत रक्कम येणार
Dharashiv Crime News: धाराशिवमध्ये कलाकेंद्र चालकाच्या घरात दरोडा; पिस्तूल अन् कोयते दाखवून 9 लाख 51 हजार लुटले, नेमकं काय घडलं?
धाराशिवमध्ये कलाकेंद्र चालकाच्या घरात दरोडा; पिस्तूल अन् कोयते दाखवून 9 लाख 51 हजार लुटले, नेमकं काय घडलं?
Sanju Samson : कसा आहेस, दु:खी होऊ नको भावा,मोठी स्पर्धा आहे, संधी कधीही मिळू शकते..रोहित शर्मानं संजूला दिलेला सल्ला, ICC कडून व्हिडीओ शेअर
कसा आहेस, दु:खी होऊ नको भावा,मोठी स्पर्धा आहे, संधी कधीही मिळू शकते..रोहित शर्मानं संजूला दिलेला सल्ला
Embed widget