Mumbai squad for Vijay Hazare Trophy 2025-26 : विजय हजारे ट्रॉफी 2025-26 हंगामाची सुरुवात 24 डिसेंबरपासून होत आहे. या प्रतिष्ठित एकदिवसीय देशांतर्गत स्पर्धेसाठी मुंबई क्रिकेट संघाने आपला संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयने सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यामुळे भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. मात्र, रोहित शर्मा केवळ सुरुवातीचे दोन सामनेच खेळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तरीही त्याची उपस्थिती मुंबई संघासाठी मोठा आत्मविश्वास ठरणार आहे. 

Continues below advertisement

Continues below advertisement

रोहित शर्माची झाली निवड, पण बाकीचे स्टार खेळाडू गायब

मात्र, भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव, सलामीवीर यशस्वी जैस्वाल तसेच अष्टपैलू शिवम दुबेचा मुंबईच्या एकदिवसीय देशांतर्गत स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. या हंगामासाठी मुंबई संघाची धुरा अनुभवी अष्टपैलू शार्दुल ठाकूर याच्याकडे सोपवण्यात आली आहे. स्टार खेळाडू नसले तरी संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा संतुलित मेळ पाहायला मिळतो. रोहित शर्मा, सरफराज खान आणि शार्दुल ठाकूरसारख्या अनुभवी खेळाडूंमुळे मुंबई संघाला स्पर्धेत मजबूत दावेदार मानले जात आहे. जयपूरच्या मैदानावर मुंबईचा हा संघ विजयासाठी कशी कामगिरी करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई संघ (Mumbai squad for Vijay Hazare Trophy) :

शार्दुल ठाकूर (कर्णधार), रोहित शर्मा (2 सामने), ईशान मुलचंदानी, मुशीर खान, अंगकृष रघुवंशी, सरफराज खान, सिद्धेश लाड, चिन्मय सुतार, आकाश आनंद (यष्टीरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), शम्स मुलान, तनुश कोटियन, तुषार देशपांडे, ओंकार तारमळे, सिल्वेस्टर डी’सूझा, सैराज पाटील, सूर्यांश शेडगे.

येथे होणार सामने...

50 षटकांच्या या स्पर्धेचे एलिट डिव्हिजन 24 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान अहमदाबाद, राजकोट, जयपूर आणि बेंगळुरू येथे होणार आहे. 12 ते 18 जानेवारी दरम्यान बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे नॉकआउट सामने खेळवले जातील. मुंबईला पंजाब, उत्तराखंड, सिक्कीम, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा आणि हिमाचल प्रदेशसह गट क मध्ये स्थान देण्यात आले आहे. 24 डिसेंबर रोजी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मुंबईचा सामना सिक्कीमशी होईल.

दिल्ली संघाची घोषणा! विराट कोहलीची निवड (Vijay Hazare Trophy Delhi Squad)

दुसरीकडे, विजय हजारे ट्रॉफीसाठी दिल्लीची स्क्वाड जाहीर करताना डीडीसीएने विराट कोहलीची उपस्थिती कन्फर्म केली असून, ऋषभ पंत आणि इशांत शर्मा हेही संघाचा भाग असतील, असं स्पष्ट केलं आहे. या स्पर्धेसाठी ऋषभ पंतकडे दिल्लीच्या संघाची कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर आयुष बडोनीची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय नितीश राणा स्क्वाडमध्ये असून, वेगवान गोलंदाज हर्षित राणा उपलब्ध असल्यास दिल्लीकडून खेळताना दिसतील. डीडीसीएने सध्या फक्त पहिल्या दोन सामन्यांसाठीच स्क्वाड जाहीर केली आहे.

हे ही वाचा -

Vijay Hazare Trophy Delhi Squad : दिल्ली संघाची घोषणा! विराट कोहलीची निवड, पण खेळणार फक्त इतके सामने; ऋषभ पंतकडे संघाची धुरा, पाहा Squad