Mumbai Indians Playing XI IPL 2026 : दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी संघांपैकी एक म्हणून पाहिला जात आहे. कर्णधार बदलला असला तरी संघाची ताकद अजूनही तशीच दिसते. या संघाची खास ताकद म्हणजे भारतीय खेळाडूंवर असलेला मोठा विश्वास. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स यंदा 5 वर्षांचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे आणि विजेतेपदासाठी मोठा दावेदार मानला जात आहे. या हंगामात मैदानात उतरणाऱ्या मुंबईच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर टाकूया...

धडकी भरवणारी ओपनिंग जोडी

मुंबई इंडियन्सच्या ओपनिंग जोडीबद्दल बोलायचे झाले तर रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत संघाकडे दोन पर्याय आहेत. क्विंटन डी कॉक आणि रायन रिकेल्टन हे दोघेही पर्याय उपलब्ध आहेत. मात्र रोहितसोबत डिकॉक ओपनिंगला उतरण्याची शक्यता अधिक मानली जात आहे. रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसला तरी संघाचा महत्वाचा कणा आहे. हार्दिक पांड्याला रोहितच्या अनुभवाचा मोठा फायदा होणार आहे. रोहित हा मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. त्याने मुंबईसाठी 236 सामन्यांत तब्बल 6,149 धावा केल्या आहेत.

तगडी मिडल ऑर्डर

मुंबई इंडियन्सचा मधला फलंदाजी क्रम देखील तितकाच मजबूत दिसतो. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि शेरफेन रदरफोर्ड यांसारखे आक्रमक फलंदाज संघात आहेत. इतर संघांच्या तुलनेत मुंबईचा मिडल ऑर्डर सर्वात मजबूत मानला जात आहे. या संघाची गोलंदाजीही तितकीच धोकादायक आहे. जसप्रीत बुमराह एकटाच सामना फिरवू शकतो, पण त्याला साथ देण्यासाठी ट्रेंट बोल्ट देखील संघात आहे. या दोघांची जोडी कोणत्याही फलंदाजी क्रमासाठी मोठे आव्हान ठरू शकते.

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग-11 (MI Playing XI IPL 2026)

रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, नमन धीर, हार्दिक पांड्या, शेरफेन रदरफोर्ड, अल्लाह गझनफर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि दीपक चाहर.

12वा खेळाडू म्हणून विल जॅक्सला संधी मिळू शकते.... 

मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ- (IPL 2026 MI Full Squad)

हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रायन रिकेल्टन, रॉबिन मिन्झ, राज बावा, रघू शर्मा, मिशेल सँटनर, कॉर्बिन बॉश, नमन धीर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गफंझार, अश्विनी कुमार, दीपक चहर, विल जैक, शेरफेन रदरफोर्ड, मयंक मारकंडे, शार्दुल ठाकुर, क्विंटन डी कॉक, दानिश मालेवार, मोहम्मद इजहार, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत

हे ही वाचा -

Kavya Maran-Abrar Ahmed : काव्या मारनने ज्या पाकिस्तानीवर टाकला विश्वास, तोच निघाला गद्दार; अबरार अहमद खेळण्यास देणार नकार, नेमकं कारण काय?