MS Dhoni IPL 2026 GT vs CSK : चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिग्गज कर्णधार MS धोनी आयपीएल 2026 मधील गुजरात टायटन्सविरुद्धच्या अखेरच्या लीग सामन्यापूर्वीच सीएसके कॅम्प सोडून घरी परतला आहे. दुखापतीमुळे धोनीने यंदाच्या हंगामात अद्याप एकही सामना खेळलेला नाही. अलीकडेच अंगठ्याला झालेल्या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याने संघापासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबादमध्ये होणाऱ्या ‘करो या मरो’ सामन्यापूर्वी चेन्नईचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांनी स्वतः याची पुष्टी केली आहे.

Continues below advertisement

धोनीचा पुढचा प्लॅन काय?

मात्र, हसी यांनी चाहत्यांना मोठा दिलासा देतानाच स्पष्ट केलं की, जर चेन्नई सुपर किंग्सने प्लेऑफसाठी पात्रता मिळवली तर धोनी पुन्हा संघात सामील होतील. पत्रकार परिषदेत धोनीच्या दुखापतीबाबत अपडेट देताना हसी म्हणाले, “सध्या तो संघासोबत नाही, याची मी पुष्टी करू शकतो. पण आम्ही क्वालिफाय झालो तर तो नक्कीच परत येईल. त्याच्या अंगठ्यात अजून थोडी वेदना आहे, मात्र तो चांगल्या प्रकारे रिकव्हर होत आहे. या सामन्यासाठी तो फिट होऊ शकला नाही. आशा आहे की आम्ही प्लेऑफमध्ये पोहोचलो तर तो पूर्णपणे तंदुरुस्त असेल.”

Continues below advertisement

प्लेऑफचं गणित कठीण

चेन्नई सुपर किंग्सला मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून झालेल्या पराभवानंतर प्लेऑफची वाट अधिक कठीण झाली आहे. गुजरातविरुद्ध विजय मिळवला तरी चेन्नईचे 14 गुण होतील, पण त्यानंतरही त्यांना इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावं लागणार आहे.

हैदराबादविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या पराभवानंतर हसी म्हणाले, “ही हार आमच्यासाठी टॉप-4 मध्ये पोहोचण्याचा मार्ग आणखी कठीण करून गेली. सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये खूप शांतता होती आणि सर्वजण निराश होते. पण प्रशिक्षकांनी आम्हाला सांगितलं की अजून एक सामना बाकी आहे, अजून एक संधी जिवंत आहे. ही हार विसरून पुढे जाणं गरजेचं आहे. आता पुढचं सगळं आमच्या दृष्टिकोन आणि अॅटिट्यूडवर अवलंबून असेल.”

सीएसकेसमोर ‘करो या मरो’

प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी चेन्नईला आता गुजरात टायटन्सविरुद्ध फक्त विजयच नव्हे तर दमदार खेळही दाखवावा लागणार आहे. संघाच्या मानसिकतेबद्दल बोलताना हसी म्हणाले की, “जोपर्यंत आम्ही सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण दृष्टिकोन ठेवतो, एकजूट राहतो आणि मैदानावर हसतमुखाने खेळतो, तोपर्यंत गोष्टी आमच्या बाजूने फिरू शकतात.”

हे ही वाचा - 

India a Squad ODI Tri-Series : भारतीय संघात अचानक झाला मोठा फेरबदल; अष्टपैलू खेळाडूची टीममध्ये 'सरप्राइज' एन्ट्री, कोण आहे तो?