MS Dhoni OUT IPL 2026 Till End of April : आयपीएल 2026 (IPL 2026) सुरू झाली असून, चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) पहिला सामना 30 मार्च रोजी गुवाहाटी येथे होणार आहे. यापूर्वी, एमएस धोनीच्या (MS Dhoni) दुखापतीची बातमी समोर आल्याने चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला होता. 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, एमएस धोनी केवळ आयपीएलमध्येच खेळतो. महेंद्रसिंग धोनीला मैदानावर पाहण्यासाठी चाहते वर्षभर वाट पाहतात, पण यावेळी ही उत्सुकता अधिकच वाढली आहे. एमएस धोनी किती सामने खेळू शकणार नाही, असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

धोनी जखमी, चाहत्यांची चिंता वाढली (MS Dhoni OUT IPL 2026 Till End of April)

आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने जाहीर केले होते की महेंद्रसिंग धोनीच्या पोटरीच्या स्नायूला दुखापत झाली आहे. परिणामी, तो खेळण्यासाठी तंदुरुस्त नाही. धोनी किती सामन्यांसाठी संघाबाहेर राहील हे सीएसकेने स्पष्ट केले नव्हते. आता, टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, एमएस धोनी जास्तीत जास्त सहा सामन्यांसाठी संघाबाहेर राहू शकतो. तो लवकर बरा झाल्यास, चार सामन्यांनंतर मैदानावर परत येऊ शकतो.

मात्र, धोनीला पूर्णपणे बरा होण्यासाठी किमान दोन आठवडे लागतील आणि 23 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याचे पुनरागमन होण्याची शक्यताही अजून अनिश्चित आहे.

CSK चे पहिले 6 सामने

चेन्नईचा सुरुवातीचा टप्पा खूप कठीण असणार आहे. मोठ्या संघांविरुद्ध सलग सामने खेळावे लागणार आहेत.

चेन्नई सुपर किंग्स vs राजस्थान रॉयल्स – 30 मार्च, गुवाहाटीचेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स – 3 एप्रिल, चेन्नईचेन्नई सुपर किंग्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – 5 एप्रिल, बंगळुरुचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स – 11 एप्रिल, चेन्नईचेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाइट रायडर्स – 14 एप्रिल, चेन्नईचेन्नई सुपर किंग्स vs सनरायझर्स हैदराबाद – 18 एप्रिल, हैदराबाद

विकेटकीपिंग कोण करणार? (MS Dhoni OUT IPL 2026 Till End of April)

धोनीच्या अनुपस्थितीत संघाची मोठी जबाबदारी आता संजू सॅमसन वर येऊ शकते. सीएसकेने ट्रेडद्वारे त्याला संघात घेतले असून, तोच मुख्य विकेटकीपर म्हणून दिसण्याची शक्यता आहे. याशिवाय कार्तिक शर्मा आणि उर्विल पटेल हे पर्याय संघाकडे उपलब्ध आहेत.

हे ही वाचा -

Harbhajan Singh IPL 2026 : कुत्ते भौंके हजार, टॉमी चल निकल...; हरभजन सिंगचा संताप OUT OF CONTROL; सोशल मीडियावर खळबळ, नेमकं काय घडलं?