एक्स्प्लोर

Harshit Rana News : गंभीरचा लाडका हर्षित राणा टी-20 विश्वचषकातून बाहेर; 2023 चा एकदिवसीय विश्वचषक गाजवणाऱ्या गोलंदाजाला संधी

Harshit Rana T20 World Cup 2026 News : टी-20 विश्वचषक 2024 च्या मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघासाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे.

Harshit Rana Ruled Out Of T20 World Cup 2026 Due To Injury : आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 च्या मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघासाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा युवा गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजला संधी मिळाली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

नेमकं काय घडलं?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान हर्षित राणाला दुखापत झाली होती. आपल्या एका षटकादरम्यान त्याला धाव घेताना अडथळा आला. त्यानंतर गुडघ्याच्या तीव्र वेदनेमुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्याने त्या सामन्यात केवळ एक षटक टाकले, ज्यात त्याने 16 धावा दिल्या होत्या. फिजियोनी त्याच्या दुखापतीची सखोल तपासणी केली असता, तो या संपूर्ण स्पर्धेसाठी तंदुरुस्त नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

युएसए विरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना कर्णधार सूर्यकुमार यादवने राणाच्या दुखापतीबाबत चिंता व्यक्त केली. तो म्हणाला की, "हर्षित राणा अद्याप अधिकृतपणे बाहेर झाला नसला तरी, त्याची परिस्थिती फारशी आशादायक दिसत नाही. आमच्या 15 खेळाडूंमध्ये तो महत्त्वाचा भाग होता. तो खालच्या फळीत फलंदाजीही करू शकत होता, त्यामुळे त्याची उणीव नक्कीच भासेल. पण आमच्याकडे इतरही चांगले पर्याय उपलब्ध आहेत."

सिराजचे पुनरागमन?

हर्षित राणा बाहेर पडल्यामुळे निवड समिती अनुभवी मोहम्मद सिराजला संघात सामील करण्याची शक्यता आहे. सिराजने गेल्या वर्षीच्या 50 षटकांच्या विश्वचषकात भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्या अनुभवाचा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो.

टी-20 विश्वचषक 2026 साठी अपडेट भारतीय संघ (T20 World Cup 2026 Updated Team India Squad) -

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

हे ही वाचा -

Vaibhav Sooryavanshi Century : 8 षटकार, 8 चौकार... वैभव सूर्यवंशीचा पुन्हा धमाका, अंडर-19 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ठोकले वादळी शतक; मोडले अनेक विक्रम

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Babar Azam : बॅटला नाही, तर डोक्यालाच गंज लागलाय...; पाकिस्तानी दिग्गज संतापला; बाबर आझमच्या अब्रूचे धिंडवडे काढले
बॅटला नाही, तर डोक्यालाच गंज लागलाय...; पाकिस्तानी दिग्गज संतापला; बाबर आझमच्या अब्रूचे धिंडवडे काढले
Sanju Samson on Abhishek Sharma : अभिषेक शर्मावर ड्रेसिंग रुममधील खेळाडू जळायचे, संजू सॅमसनचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
अभिषेक शर्मावर ड्रेसिंग रुममधील खेळाडू जळायचे, संजू सॅमसनचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Kuldeep Yadav Vanshika Wedding : अखेर स्पिनर कुलदीप क्लीन बोल्ड! बालमैत्रीण वंशिकासोबत घेतले सात फेरे, फोटो पाहून सगळेच थक्क, चहल-तिलकच्या डान्सने वेड लावलं
अखेर स्पिनर कुलदीप क्लीन बोल्ड! बालमैत्रीण वंशिकासोबत घेतले सात फेरे, फोटो पाहून सगळेच थक्क, चहल-तिलकच्या डान्सने वेड लावलं
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
Iran War Live Update: अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
Babar Azam : बॅटला नाही, तर डोक्यालाच गंज लागलाय...; पाकिस्तानी दिग्गज संतापला; बाबर आझमच्या अब्रूचे धिंडवडे काढले
बॅटला नाही, तर डोक्यालाच गंज लागलाय...; पाकिस्तानी दिग्गज संतापला; बाबर आझमच्या अब्रूचे धिंडवडे काढले
Nagpur Biggest Solar Parts Project: चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
Jal Jeevan Mission: पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
Donald Trump on Mojtaba Khamenei: इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा मृत्यू? डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा; म्हणाले...
इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा मृत्यू? डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा; म्हणाले...
Beed Crime: बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार, दोरखंडातून सोडवायला एकही गावकरी पुढे आला नाही
बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार, सोडवायला एकही गावकरी पुढे आला नाही
Embed widget