एक्स्प्लोर

Mohammed Siraj T20 World Cup : सूर्यकुमार यादवचा फोन अन्.... सामन्यानंतर भावूक झाला मोहम्मद सिराज, 24 तास आधी 'त्या' रात्री काय घडलं?, मोबाईल दाखवत सगळं सांगितलं

IND vs USA T20 World Cup : टी-20 वर्ल्डकप 2026 मध्ये टीम इंडियाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे दमदार झाली असली, तरी अमेरिकेसारख्या तुलनेने कमकुवत संघाविरुद्ध भारताची फलंदाजी निराशाजनक ठरली.

Mohammed Siraj T20 World Cup : टी-20 वर्ल्डकप 2026 मध्ये टीम इंडियाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे दमदार झाली असली, तरी अमेरिकेसारख्या तुलनेने कमकुवत संघाविरुद्ध भारताची फलंदाजी निराशाजनक ठरली. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने जबाबदारीने खेळत संघाला सावरलं. मात्र गोलंदाजीत मोहम्मद सिराजने जे केलं, ते केवळ सामन्यापुरतंच नाही तर त्यांच्या कारकिर्दीतील खास क्षण ठरला. विशेष म्हणजे, अवघ्या 24 तासांपूर्वीपर्यंत वर्ल्डकपच्या प्लॅनमध्ये सिराज नव्हता. हर्षित राणाच्या दुखापतीमुळे अखेरच्या क्षणी सिराजला संघात संधी मिळाली आणि त्याने ती संधी दोन्ही हातांनी पकडली.

पहिल्याच सामन्यात सिराजने 3 बळी घेत भारताला मोठ्या उलटफेरापासून वाचवलं. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना सिराज अक्षरशः भावूक झाला. तो म्हणाला, “मला पूर्ण खात्री होती की मी हा वर्ल्ड कप खेळणार नाही. गेल्या वर्षभरापासून मी टी-20 खेळत नव्हतो, त्यामुळे मी स्वतःलाच समजावलं होतं. पण वरच्याने संपूर्ण नशिबच बदलून टाकलं.”

सूर्यकुमार यादवचा फोन अन्.... 

सिराजने त्या अविस्मरणीय क्षणाचा उलगडा करताना सांगितलं की, “24 तास आधी मी कुटुंबासोबत होतो. मला मेसेज आला ‘पुढचा प्लॅन काय आहे?’ मी म्हटलं, मला त्रास देऊ नका, मी आराम करतोय. तेवढ्यात सूर्यकुमार यादवचा फोन आला.” सूर्या म्हणाला की, मिया, तयार हो आणि बॅग पॅक करून ये.’ मी हसून म्हणालो, ‘सूर्या भाई, गंमत करू नकोस, असं होणार नाही.’ पण तो म्हणाला – ‘मिया, खरंच सांगतोय… ये.’ त्या क्षणी मला जबरदस्त धक्का बसला.” 

फ्लाइटमध्ये बसल्यावरही हे सगळं स्वप्नासारखंच वाटत होतं, वरच्याने जे लिहिलंय, ते कोणीही बदलू शकत नाही. मी संघात आलो, सामना खेळलो आणि देशासाठी योगदान दिलं, गॉड ग्रेट आहे, असं सिराज म्हणाला.

‘वर्ल्ड कप खेळणं म्हणजे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न...’

आपल्यावर दबाव होता का, या प्रश्नावर सिराज म्हणाला की, “इमोशन असतंच. वर्ल्ड कप खेळणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. मी ठरवलं होतं, जसं रणजीमध्ये करतो, तसंच करायचं. नवी चेंडू फलंदाजांसाठी सोपी नव्हती. विकेट टू विकेट टाकली आणि बळी मिळाले.”

हे ही वाचा -

T20 World Cup 2026 Points Table : सूर्यकुमारचा फटका, पाकिस्तानला धक्का! Points Table मध्ये उलथापालथ; भारत अव्वल, पाकिस्तान कुठे? जाणून घ्या सगळं

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल मॅचचं तिकीट मिळवण्याची शेवटची संधी? एका तिकिटासाठी किती रुपये मोजावे लागणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल मॅचचं तिकीट मिळवण्याची शेवटची संधी? एका तिकिटासाठी किती रुपये मोजावे लागणार?
Pakistan Squad News : पाकिस्तान टीमची घोषणा अन् कराची ते लाहोरमध्ये खळबळ! लाडका बाबर आझम संघातून OUT, 6 नवीन चेहरे IN; कोण झाला कर्णधार?
पाकिस्तान टीमची घोषणा अन् कराची ते लाहोरमध्ये खळबळ! लाडका बाबर आझम संघातून OUT, 6 नवीन चेहरे IN; कोण झाला कर्णधार?
ICC T20 Rankings Update : संजू सॅमसनचं ICC रँकिंगमध्ये वादळ! 25 खेळाडूंना टाकलं मागे; सूर्या मात्र तोंडावर पडला, अभिषेक शर्माचं काय झालं?
संजू सॅमसनचं ICC रँकिंगमध्ये वादळ! 25 खेळाडूंना टाकलं मागे; सूर्या मात्र तोंडावर पडला, अभिषेक शर्माचं काय झालं?
IND vs ENG T20 World Cup Semi Final : सलग 5 विजय, इंग्लिश कॅप्टनने ओलांडली सीमा; टीम इंडियाला दिलं खुलं चॅलेंज, म्हणाला...
सलग 5 विजय, इंग्लिश कॅप्टनने ओलांडली सीमा; टीम इंडियाला दिलं खुलं चॅलेंज, म्हणाला...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Ali Larijani: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
अली लारीजानी: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल मॅचचं तिकीट मिळवण्याची शेवटची संधी? एका तिकिटासाठी किती रुपये मोजावे लागणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल मॅचचं तिकीट मिळवण्याची शेवटची संधी? एका तिकिटासाठी किती रुपये मोजावे लागणार?
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
Share Market Crash : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचा फटका,सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
Iran : अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
Embed widget