Mohammed Shami-Rohit Sharma : विषय निघताच रोहित बोलला, पण शमी भडकला; टीम इंडियातील वाद चव्हाट्यावर?
भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर तो पुनरागमन करू शकला नाही.
Mohammed Shami-Rohit Sharma : भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर तो पुनरागमन करू शकला नाही. तो मैदानात परतला असला तरी टीम इंडियात परतण्याची वाट पाहत आहे. दरम्यान, शमी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळत असून गोलंदाजीसोबतच तो फलंदाजीतही कहर करत आहे. शमीने अवघ्या 17 चेंडूत 32 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान, त्याने दोन षटकार आणि तीन चौकार मारले. शमी त्याच्या फलंदाजीसाठी ओळखला जात नाही, त्याची ओळख गोलंदाजीमध्ये आहे. शमीने या सामन्यात आपल्या संघासाठी चार षटके टाकली आणि 25 धावांत एक विकेट घेतली.
दरम्यान, टीम इंडिया ऑस्ट्रेलियात आहे. जिथे 5 कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. दोन सामने झाले आहेत, पण अजून तीन बाकी आहेत. ॲडलेड कसोटीत 10 गडी राखून पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियाला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची उणीव भासत आहे. पिंक बॉल कसोटीत जसप्रीत बुमराहने एका टोकाकडून दडपण निर्माण केले, पण हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज दुसऱ्या टोकाकडून कांगारू संघावर दबाव निर्माण करण्यात अपयशी ठरले. अशा परिस्थितीत मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असल्याच्या बातम्या वाढू लागल्या आहे.
दरम्यान, मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, मोहम्मद शमी आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मामध्ये अंतर्गत वाद असल्याचे बोलले जात आहे. मोहम्मद शमीने काही काळापूर्वी पूर्णपणे फिट असल्याचा दावा केला होता. पण पत्रकार परिषदेत रोहितला प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी मोहम्मद शमी 100 टक्के फिट नाही. रोहितच्या वक्तव्यामुळे शमी भडकला असा दावा अहवालात करण्यात आला आहे. दैनिक जागरणचा हवाला देत एका सूत्राने सांगितले की, कर्णधार रोहित आणि शमी बेंगळुरूमध्ये भेटले होते, त्यावेळी त्यांच्यात वाद झाला होता.
या वृत्तात म्हटले आहे की, "जेव्हा शमी नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये होता, तेव्हा रोहित आणि शमी बंगळुरूमधील पहिल्या कसोटीदरम्यान भेटले. कर्णधाराने दिलेल्या एका विधानावरून दोघांमध्ये वाद झाला, ज्यामध्ये रोहितने शमीवर टीका केली होती.
शमी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणार का?
आता ॲडलेड कसोटी संपल्यानंतर रोहित म्हणाला होता की, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या मध्यावर शमीच्या पुनरागमनासाठी दरवाजे खुले आहेत, परंतु संघ व्यवस्थापन त्याच्या पुनरागमनाची घाई करू इच्छित नाही. रोहितने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते की संघ व्यवस्थापनाचे अधिकारी त्याच्या फिटनेसवर सतत लक्ष ठेवून आहेत.
हे ही वाचा -