Mohammad Nabi Smashes Half-Century : अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू मोहम्मद नबीने आशिया कप 2025 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना तुफानी फलंदाजी करून खळबळ उडवून दिली. अबू धाबीतील शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नबी हा खरा ‘हिरो’ ठरला. त्याने एकहाती श्रीलंकेच्या गोलंदाजांची धू धू धुलाई करत अफगाणिस्तानला भक्कम धावसंख्येपर्यंत नेले. शेवटच्या षटकात नबीने जबरदस्त कामगिरी करत अफगाण प्रेक्षकांना अक्षरशः वेडं केलं. श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंका याने चेंडू स्पिनर डुनिथ वेल्लालेजला दिला, आणि त्यानंतर जे घडलं त्याने सगळ्यांनाच थक्क केलं.

अखेरच्या षटकात 5 सलग षटकार

नबीने डुनिथ वेल्लालेजच्या अखेरच्या षटकात तब्बल 5 सलग षटकार ठोकले. एक क्षणासाठी असं वाटलं की तो एका षटकात 6 षटकार ठोकणाऱ्या खास क्लबमध्ये सामील होईल, पण अखेरच्या चेंडूवर मात्र तो षटकार मारू शकला नाही. या षटकात तब्बल 32 धावा निघाल्या आणि अफगाणिस्तानने श्रीलंकेसमोर 170 धावांचे टार्गेट ठेवलं.

मोहम्मद नबी झाला ‘बाहुबली’

आशिया कप 2025 मधील अकराव्या सामन्यात श्रीलंकेचा सामना अफगाणिस्तानशी झाला. टॉस जिंकून कर्णधार राशिद खानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अठराव्या षटकापर्यंत अफगाणिस्तानची खेळी संथ गतीने सुरू होती. पण नंतर मोहम्मद नबी अक्षरशः ‘बाहुबली’ बनला आणि शेवटच्या 12 चेंडूंमध्ये धावांचा पाऊस पाडला आला. नबीने फक्त 22 चेंडूत 60 धावांची तुफानी खेळी साकारली. त्याने अखेरच्या षटकात 5 षटकार मारले. नबीच्या या जबरदस्त खेळीत 6 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. त्याच्या आक्रमक खेळीमुळे अफगाणिस्तानने शेवटच्या 12 चेंडूंमध्ये तब्बल 49 धावा जमवून 170 धावांचा भक्कम स्कोर उभा केला.

फक्त 20 चेंडूत अर्धशतक 

यादरम्यान मोहम्मद नबीने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यामुळे तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानकडून संयुक्तपणे सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा खेळाडू ठरला. यापूर्वीच, या आशिया कपमध्येच अझमतुल्लाह उमरझईने हाँगकाँग चायनाविरुद्ध 20 चेंडूत फिफ्टी ठोकली होती.

हे ही वाचा -

Zaheer Khan : एलएसजीच्या चाहत्यांना मोठा धक्का! 1 सीझननंतरच झहीर खाननं mxI केला रामराम, पडद्यामागे नेमकं काय घडलं?