Michael Clarke Car Accident : गाडीत झोपला होता वर्ल्डकप विजेता कर्णधार, ट्रकखाली घुसली कार अन्...; पुढे जे घडलं ते हादरवणारं
Michael Clarke Car Accident : ऑस्ट्रेलियाचा माजी विश्वविजेता कर्णधार मायकल क्लार्क याने आयपीएल 2026 फायनलनंतर स्वतःसोबत घडलेल्या एका धक्कादायक अपघाताचा खुलासा केला आहे.

Michael Clarke Car Accident : ऑस्ट्रेलियाचा माजी विश्वविजेता कर्णधार मायकल क्लार्क याने आयपीएल 2026 फायनलनंतर स्वतःसोबत घडलेल्या एका धक्कादायक अपघाताचा खुलासा केला आहे. भारतातून विमानतळाकडे जात असताना त्याच्या कारचा भीषण अपघात झाला. विशेष म्हणजे क्लार्क त्या वेळी कारमध्ये होता आणि प्रवासादरम्यान झोपला होता. Beyond 23 Cricket या पॉडकास्टमध्ये बोलताना क्लार्क याने संपूर्ण घटना सांगितली. त्याने सांगितले की, आयपीएल फायनल संपल्यानंतर तो विमानतळाकडे निघाला होता. मोठा दिवस आणि सामन्याच्या कामानंतर तो कारमध्येच झोपला. मात्र अचानक जाग आली तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर भयानक दृश्य होते.
क्लार्क म्हणाला, "सर्वप्रथम भारतातील चांगल्या लोकांचे आणि देवाचे आभार मानू इच्छितो की मी सुरक्षित घरी पोहोचलो. सामना संपल्यानंतर मी कारमध्ये झोपलो होतो. अचानक जाग आली तेव्हा पाहिले की आमच्या कारचा पुढचा अर्धा भाग एका ट्रकच्या खाली घुसला होता."
ट्रकच्या ब्रेक लाईटमुळे घडला अपघात? (Michael Clarke Car Accident)
अपघातानंतर ड्रायव्हरने क्लार्क याने संपूर्ण घटना सांगितली. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार, समोर असलेल्या ट्रकच्या ब्रेक लाईट्स नीट काम करत नव्हत्या. त्यामुळे ट्रक अचानक मंदावल्याचे लक्षात न आल्याने कार थेट ट्रकला धडकली.
Just before the IPL final, while returning home and heading to the airport, Michael Clarke was involved in a serious road accident.
— Cricketopia (@CricketopiaCom) June 4, 2026
Travelling as a passenger, the vehicle he was in collided with a semi-trailer, with the front half of the car becoming lodged underneath the… pic.twitter.com/NXYs6HclxO
क्लार्कने सांगितले की, "ड्रायव्हरने मला सांगितले की ट्रकच्या ब्रेक लाईट्स बंद होत्या. त्यामुळे त्याला ट्रकचा वेग कमी झाल्याचे दिसले नाही. तो एक मोठा सेमी-ट्रेलर ट्रक होता आणि आमची कार थेट त्याच्या खाली घुसली. अपघातानंतर कार पूर्णपणे चुराडा झाली होती."
क्लार्क थोडक्यात बचावला, ड्रायव्हर जखमी (Michael Clarke Car Accident)
इतका मोठा अपघात होऊनही क्लार्क सुदैवाने किरकोळ दुखापतींसह बचावला. मात्र ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाल्याची भीती त्याने व्यक्त केली. "मला फक्त किरकोळ दुखापती झाल्या. पण ड्रायव्हरच्या पायाला फ्रॅक्चर झाले असावे असे वाटते. तो खूप घाबरला होता. कार त्याची नव्हती, तो एका कंपनीसाठी काम करत होता. त्याची अवस्था पाहून मला खूप काळजी वाटत होती," असे क्लार्क म्हणाले.
BCCI आणि स्थानिकांच्या मदतीबद्दल आभार (Michael Clarke Car Accident BCCI)
या घटनेनंतर क्लार्क यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) तसेच स्थानिक लोकांचे विशेष आभार मानले. तो म्हणाले, "BCCI मधील सर्वजण आणि तिथले स्थानिक लोक सतत आमची विचारपूस करत होते. त्याच्या मदतीबद्दल मी खूप आभारी आहे. हा एक अपघात होता, अशा घटना कधीही घडू शकतात. पण झोपेतून जाग आल्यावर स्वतःला ट्रकच्या खाली पाहणे हा माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक अनुभव होता."
हे ही वाचा -




















