Abhishek Nayar T20 Mumbai League : टी-20 मुंबई लीग पुन्हा एकदा मुंबईच्या क्रिकेट विश्वात परतत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) भारताचा कर्णधार रोहित शर्माला टी-20 मुंबई लीगच्या तिसऱ्या हंगामाचा चेहरा (Face of The League) म्हणून घोषित केले आहे. आता यासोबतच अनेक मोठी नावे या लीगमध्ये सामील होऊ लागली आहेत. रोहित शर्मा चेहरा असलेल्या स्पर्धेत आता अभिषेक नायरला जबाबदारी मिळाली आहे. 26 एप्रिल रोजी लीगसाठी भारताचे माजी क्रिकेटपटू अभिषेक नायर यांनी मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स तर माजी गोलंदाजी प्रशिक्षक पारस यांना म्हांब्रे एआरसीएस अंधेरी संघांचे मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

अलीकडेच, अभिषेक नायरला भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर तो आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्समध्ये परतला. आता तो टी-20 मुंबई लीगमध्ये त्याचा धोरणात्मक सल्ला आणि अनुभव देखील शेअर करेल. 

अभिषेक नायर फक्त 8 महिन्यांपूर्वीच टीम इंडियामध्ये सामील झाला होता. गेल्या वर्षी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाच्या पराभवानंतर त्यांना टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदावरून काढून टाकण्यात आले होते. यानंतर, आता तो टी-20 लीगमध्ये पुनरागमन करत आहे.

जवळजवळ 6 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर टी-20 मुंबई लीग पुनरागमन करत आहे. हे 26 मे ते 8 जून दरम्यान आयोजित केले जाईल. तिसऱ्या सत्रात एकूण 8 संघ सहभागी होतील. यावेळी लीगबाबत खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. आतापर्यंत, लीगसाठी विक्रमी 2,800 क्रिकेटपटूंनी नोंदणी केली आहे. या लीगमध्ये केवळ अभिषेक आणि पारसच नाही तर ओंकार साळवी, राजेश पवार, अतुल रानडे आणि माजी अनुभवी फिरकी गोलंदाज प्रवीण तांबे ही नावे देखील वेगवेगळ्या फ्रँचायझींचे मुख्य प्रशिक्षक म्हणून दिसतील.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी यावेळी सांगितले की, 'टी-20 मुंबई लीगसाठी रोहित शर्माची तिसऱ्या हंगामाचा चेहरा म्हणून घोषणा करताना आम्हाला अभिमान वाटतो. त्यांची उल्लेखनीय कामगिरी आणि प्रवास मुंबई क्रिकेटच्या जिद्द, चिकाटी, मेहनत आणि महत्त्वाकांक्षा या मूलभूत मूल्यांचं प्रतीक आहे. त्यांचा लीगसोबतचा सहभाग केवळ युवा क्रिकेटपटूंना प्रेरणा देणार नाही, तर लीगची प्रतिष्ठाही वाढवेल. त्याचबरोबर टी-20 मुंबई लीग कुटुंबात दोन नवीन फ्रँचायझी चालकांचे स्वागत करताना आम्ही तितकेच उत्साहित आहोत. विविध भागधारकांकडून वाढत असलेल्या रसशीतून, आमचे उद्दिष्ट म्हणजे मुंबईतील प्रतिभावान खेळाडूंना आणखी मोठं व्यासपीठ देणं आणि भारताचे पुढचे क्रिकेट हिरो घडवणं. 

हे ही वाचा -

Sunrisers Hyderabad : आयपीएलमधून जाण्यासाठी गाडी क्रमांक 1552 फिक्स, पण हैद्राबादचा वेगळाच थाट; काव्या मारनची अख्खी टीम विदेशात ट्रीपला