LSG vs GT Score : गिल-बटलरच्या वादळात लखनऊचा किल्ल्याचा ढासळला; गुजरात टायटन्सचा 7 विकेट्स राखून दणदणीत विजय

Lucknow Super Giants vs Gujarat Titans Update Marathi : सुपर संडेचा पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एकाना स्टेडियमवर खेळला जाईल.

किरण महानवरLast Updated: 12 Apr 2026 07:07 PM

पार्श्वभूमी

Lucknow Super Giants vs Gujarat Titans Live Update Marathi : आयपीएल 2026 मध्ये आज दोन सामने खेळले जाणार आहेत. सुपर संडेचा पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात...More

LSG vs GT Score : गिल-बटलरच्या वादळात लखनऊचा किल्ल्याचा ढासळला; गुजरात टायटन्सचा 7 विकेट्स राखून दणदणीत विजय

आयपीएल 2026 चा 19 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर गुजरातने टायटन्सचा 7 गडी राखून पराभव केला. गुजरातकडून शुभमन गिल आणि जोस बटलर यांनी अर्धशतके झळकावून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 


प्रथम फलंदाजी करताना, लखनऊ सुपर जायंट्सने 20 षटकांत 8 गडी गमावून 164 धावा केल्या. गुजरात टायटन्सने 18.4 षटकांत 3 गडी गमावून 165 धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि 7 गडी राखून सामना जिंकला.