Salman Ali Agha Run OUT Ban vs Pak 2nd ODI : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील (Bangladesh vs Pakistan 2nd ODI) तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळवला गेला. यादरम्यान खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडेमध्ये सलमान अली आगा (Salman Ali Agha) याच्या वादग्रस्त रनआऊटने मोठी चर्चा रंगली आहे. या घटनेनंतर लिटन दास याने मैदानाबाहेरही आपली नाराजी व्यक्त केली.

Continues below advertisement

लिटन दास संतापला....

लिटन दास याने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, इथे कोणीही चॅरिटी लीग नाही तर हा एक आंतरराष्ट्रीय सामना आहे.” तो पुढे म्हणाला, “हा रनआऊट नियमांच्या चौकटीत होता. त्यामुळे कोणत्याही दृष्टीने खेळभावनेचा भंग झाला असे मला वाटत नाही. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. पण खेळाडू म्हणून आमच्या दृष्टीने ‘आऊट म्हणजे आऊट’च असते.” दरम्यान, रनआऊट झाल्यानंतर सलमान अली आगा याने मैदानावर नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळी लिटन दास देखील संतापला होता, मात्र मोहम्मद रिझवानने परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.

Continues below advertisement

 रनआऊट नेमका कसा झाला?, सलमान आगासोबत नेमकं काय घडलं? (Salman Ali Agha Run OUT Ban vs Pak 2nd ODI)

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 47.3 षटकांत सर्वबाद 274 धावा केल्या. मात्र पाकिस्तानच्या डावात सलमान आगाचा रनआउट हा सर्वात चर्चेचा विषय ठरला. पाकिस्तानी डावातील 39व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ही घटना घडली. त्या वेळी मेहदी हसन मिराज गोलंदाजी करत होता, तर मोहम्मद रिजवान स्ट्राईकवर फलंदाजी करत होता. रिजवानने चेंडू हलकासा पुश केला, त्यामुळे चेंडू गोलंदाजाच्या दिशेने परत जात होता. दरम्यान, नॉन-स्ट्रायकर एंडवर उभा असलेला सलमान आगा क्रीजच्या बाहेर होता. चेंडू सलमानच्या बॅटला लागून मेहदी हसनच्या हातात गेला. त्या क्षणी दोघांमध्ये धडकही झाली. त्यामुळे सलमान तो चेंडू उचलण्यासाठी खाली वाकला. मात्र त्याआधीच मेहदी हसनने चेंडू उचलून थेट स्टंप्सवर फेकला आणि रनआउटची अपील केली. नियमांनुसार तिसऱ्या पंचांनी सलमान आगाला बाद घोषित केले. 

हे ही वाचा -

Who is Vanshika Chadha : ऑस्ट्रेलियातून शिक्षण, एलआयसीत बड्या पदावर नोकरी… आता कुलदीप यादवसोबत बांधणार लग्नगाठ, कोण आहे वंशिका चड्ढा?