Ind vs Aus 2nd Test Rohit Sharma : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका गेल्या आठवड्यात पर्थमध्ये सुरू झाली. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने शानदार प्रदर्शन करत विजय मिळवला आणि 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये होणार आहे, जो डे-नाईट असेल.
या कारणास्तव, भारतीय संघ कॅनबेरा येथे पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध पिंक बॉलने दोन दिवसीय सराव सामना खेळत आहे. मात्र, या सामन्याचा पहिला दिवस पावसाने वाहून गेल्याने नाणेफेकही होऊ शकली नाही. मात्र आता दुसऱ्या दिवशी हवामान चांगले दिसत आहे, दोन्ही संघ 50-50 षटकांचा खेळ करत आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पंतप्रधान इलेव्हनविरुद्धच्या नाणेफेकीनंतर लगेचच भारतीय संघाच्या खेळाडूंची लिस्ट चर्चेचा विषय बनली आणि सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. कर्णधार रोहित शर्माचे नाव ओपनिंगमध्ये नसल्यामुळे ती लिस्ट जास्त व्हायरल होत आहे. संघाच्या त्या यादीत त्याचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे रोहित शर्मा पिंक बॉल कसोटीत ओपनिंग करणार नाही का अशी चर्चा आहे. टीम इंडियाच्या सराव सामन्यांच्या यादीत यशस्वी जैस्वालचे नाव वर आहे, त्यानंतर केएल राहुलचे नाव आहे. या दोघांनी पर्थमध्ये सलामी दिली आणि भारताला चांगली सुरुवात करून दिली होती.
सलामीवीर म्हणून राहुल चांगलाच प्रभावी ठरला. या कारणास्तव, रोहित नाही तर राहुलला वरच्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. आता सराव सामन्यात रोहित पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार की डावाची सुरुवात करणार हे पाहायचे आहे.
रोहित शर्मा पर्थ कसोटीसाठी उपलब्ध नव्हता. त्याची पत्नी रितिका सजदेह दुसऱ्यांदा आई झाली आहे आणि त्यामुळेच रोहितने तिच्यासोबत काही वेळ घालवण्याचा निर्णय घेतला होता. याच कारणामुळे तो पहिल्या कसोटीदरम्यान टीम इंडियात सामील झाला.
हे ही वाचा -