KL Rahul Century News : जावयाने मैदान मारलं, अन् सासऱ्यांचे डोळे भरून आले! KL राहुलच्या शतकानंतर सुनील शेट्टींची रिॲक्शन व्हायरल, नेमकं काय घडलं?, VIDEO
KL Rahul Century Ranji Trophy : केएल राहुलने रणजी ट्रॉफीमध्ये जबरदस्त पुनरागमन करत आपली चमक दाखवली आहे.

KL Rahul Century Ranji Trophy : केएल राहुलने रणजी ट्रॉफीमध्ये जबरदस्त पुनरागमन करत आपली चमक दाखवली आहे. उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात त्याने शानदार शतक ठोकले. विशेष म्हणजे, ज्यावेळी राहुल मैदानात धावांचा पाऊस पाडत होता, तेव्हा त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे सासरे आणि बॉलिवूड सुपरस्टार सुनील शेट्टी स्वतः स्टेडियममध्ये उपस्थित होते.
नेमकं काय घडलं?
केएल राहुल फलंदाजी करत असताना सुनील शेट्टी यांच्यासोबत राहुलचा अभिनेता आहान शेट्टी देखील स्टँडमध्ये बसून सामन्याचा आनंद घेत होता. राहुलने आपले शतक पूर्ण केले, तेव्हा सुनील शेट्टी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी उभे राहून टाळ्या वाजवत आपल्या जावयाचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील अभिमान आणि डोळ्यांतील समाधान स्पष्टपणे दिसून येत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना सासरा-जावयाचे हे प्रेमळ नाते आणि सुनील शेट्टींची ही रिॲक्शन खूपच आवडली आहे.
Back-to-back 💯s
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 15, 2026
🎥 Watch the moment KL Rahul brought up his 2️⃣5️⃣th First Class century!
Updates ▶️ https://t.co/SztwjvwUiI@IDFCFIRSTBank | @klrahul pic.twitter.com/QS963JMU0e
मयंक अग्रवाल अपयशी! पडिक्कल अन् राहुलनं ठोकलं शतकं
रणजी ट्रॉफीत उत्तराखंड आणि कर्नाटक (Uttarakhand vs Karnataka Semi-Final Ranji Trophy) यांच्यात सामना रंगला आहे, मयंक अग्रवालच्या अनुपस्थितीत कर्नाटकच्या संघाची धुरा देवदत्त पडिक्कल यांच्याकडे सोपवण्यात आली होती. पडिक्कल याने शानदार शतकीय खेळी केली आणि नेतृत्वाला साजेशी कामगिरी बजावली. त्याच्या सोबत संघात स्थान मिळालेल्या केएल राहुल यानेही अप्रतिम फलंदाजी करत शतक झळकावले. दोघांच्या भक्कम भागीदारीमुळे कर्नाटकला दमदार सुरुवात मिळाली. करुण नायरच्या जागी संघात समावेश झालेल्या राहुल याने आपली निवड योग्य ठरवत शतक ठोकले. दुसरीकडे, भारतासाठी कसोटीत द्विशतक झळकावणारे मयंक अग्रवाल मात्र या सामन्यात अपयशी ठरले.
11 चौकार, 5 षटकार अन् 140 धावा! केएल राहुल तांडव
भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुल याने उत्तराखंडविरुद्ध 140 धावांची शानदार खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने 11 चौकार आणि 5 षटकार मारत प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखले जाणारे राहुलचा विक्रमही तितकाच भक्कम आहे. राहुलने आतापर्यंत 118 प्रथम श्रेणी सामन्यांतील 206 डावांत 44.90 च्या सरासरीने 8757 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 337 आहे. कारकिर्दीत राहुने एकूण 25 शतके आणि 41 अर्धशतके झळकावली आहेत.
हे ही वाचा -





















