एक्स्प्लोर

KL Rahul Century IND vs WI Test : केएल राहुलने 9 वर्षांनंतर घरच्या मैदानावर ठोकले शतक, शिट्टी वाजवून सेलिब्रेशन, पाहा Video

KL Rahul Century IND vs WI Test : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर के. एल. राहुल याने अहमदाबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात दमदार शतक झळकावले.

KL Rahul Century IND vs WI Test : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर के. एल. राहुल याने अहमदाबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात दमदार शतक झळकावले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे अकरावे शतक आहे. राहुलने 190 चेंडूंचा सामना करताना 12 चौकारांसह शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने शिट्टी वाजवून सेलिब्रेशन केले.  त्याने कर्णधार शुभमन गिलसोबत 98 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी उभारली. गिलनेदेखील अर्धशतक (50) झळकावत साथ दिली. राहुलच्या संयमी आणि परिपक्व फलंदाजीमुळे भारताने या कसोटीत मजबूत पकड मिळवली आहे.

भारतात राहुलचे दुसरे शतक (KL Rahul 2nd Test Century In India) 

राहुलने डावाची सुरुवात सावधगिरी केली. त्याने 101 चेंडूत आपले पहिले 50 धावा पूर्ण केल्या. 2016 नंतर भारतात केलेले हे त्याचे पहिले शतक आहे. त्यावेळी त्याने चेन्नईत इंग्लंडविरुद्ध 199 धावा केल्या होत्या. या काळात त्याने 11 अर्धशतके झळकावली होती, मात्र ती शतकांत रूपांतरित करण्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे भारतातील कसोटी क्रिकेटमध्ये राहुलचे हे फक्त दुसरे शतक आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार कामगिरी

वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये राहुल सातत्याने चमकला आहे. आठ कसोटी सामन्यांतील 11 डावांत त्याने 450 पेक्षा जास्त धावा केल्या असून त्याची सरासरी 51 पेक्षा जास्त आहे. 2016 मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 158 धावांची खेळी केली होती. या शतकामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध त्याची शतकांची संख्या दोन झाली आहे. तसेच, त्याने या संघाविरुद्ध दोन अर्धशतकेही झळकावली आहेत.

राहुलची कसोटी कारकीर्द

आत्तापर्यंत राहुलने 64 कसोटी सामने खेळले असून 112 डावांत त्याच्या नावावर 3,800 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 36 पेक्षा जास्त आहे. त्याने 11 शतके आणि 19 अर्धशतके केली असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 199 आहे. भारताबाहेर खेळताना त्याने 43 कसोट्यांत 9 शतकांसह 2,640 धावा केल्या आहेत, तर भारतात 21 कसोट्यांत 2 शतकांसह 1,200 हून अधिक धावा त्याच्या नावावर आहेत.

वेस्ट इंडिजचा डाव

नाणेफेक जिंकून फलंदाजीस उतरताना वेस्ट इंडिज संघ पूर्णपणे ढेपाळला. जॉन कॅम्पबेल (8) आणि टेग्नारिन चंद्रपॉल (0) स्वस्तात बाद झाले. अखेर संपूर्ण संघ फक्त 44.1 षटकांत गडगडला. जस्टिन ग्रीव्हजने सर्वाधिक 32 धावा केल्या. त्याशिवाय शाई होपने 26 आणि रोस्टन चेसने 24 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने 4 तर जसप्रीत बुमराहने 3 बळी घेतले.

हे ही वाचा -

Women's World Cup Points Table : बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानच्या पराभवानं टीम इंडियाचं वाटोळं, वर्ल्ड कप 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ, जाणून घ्या अपडेट्स

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 1st T20 : श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
IND vs WI 1st T20I Score : टीम इंडियाचा 8 विकेट्सनी दणदणीत विजय
टीम इंडियाचा 8 विकेट्सनी दणदणीत विजय
IND Squads vs NZ Tour : बीसीसीआयची मोठी घोषणा! न्यूझीलंड दौऱ्यासाठी 2 टीम जाहीर, ध्रुव जुरेलकडे भारत ‘अ’ संघाची धुरा, वाचा संपूर्ण Squad
बीसीसीआयची मोठी घोषणा! न्यूझीलंड दौऱ्यासाठी 2 टीम जाहीर, ध्रुव जुरेलकडे भारतीय संघाची धुरा, वाचा संपूर्ण Squad
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget