KKR vs DC Live Score Updates : दिल्लीच्या 'कॅपिटल्स' पुढे कोलकाता 'नाईट' ढेर; 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची गाडी 163 वरच रोखली
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Live Score Updates IPL 2026 : आयपीएल 2026 च्या लीग टप्प्यातील अंतिम सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे.

पार्श्वभूमी
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Live Score Updates IPL 2026 : आयपीएल 2026 च्या लीग टप्प्यातील अंतिम सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात डबलहेडर खेळला जात...More
आयपीएल 2026 च्या 70 व्या चुरशीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 40 धावांनी पराभव केला.
पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 षटकांत अवघ्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 203 धावांचा टप्पा गाठला.
204 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खराब झाली.
दिल्लीच्या अचूक गोलंदाजीसमोर केकेआरचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले.
18.4 षटकात कोलकाताला 10 गड्यांच्या मोबदल्यात 163 धावाच करता आल्या.
दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर 204 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
रविवारी ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, दिल्लीने केएल राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत पाच गडी गमावून 203 धावा केल्या.
केकेआरकडून सौरभने दोन बळी घेतले, तर अनुकूल, नरेन आणि वरुण यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.