एक्स्प्लोर

SRH vs KKR IPL 2026 : 'किंग खान'चे शिलेदार जिंकले! रहाणेच्या बॅटची जादू अन् रघुवंशीचा राडा; हैदराबादचा किल्ला ढासळला, केकेआर अजूनही शर्यतीत

Kolkata Knight Riders Beat Sunrisers Hyderabad IPL 2026 : आयपीएल 2026 मधील 45 व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

Kolkata Knight Riders Beat Sunrisers Hyderabad IPL 2026 : आयपीएल 2026 मधील 45 व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) सनरायझर्स हैदराबादवर (SRH) 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात केकेआरच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय चुकला, कारण संपूर्ण संघ 19 षटकांत अवघ्या 165 धावांवर गारद झाला. माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाता नाइट रायडर्सने हे लक्ष्य 3 गडी राखून सहज पूर्ण केले. या विजयामुळे केकेआरच्या आत्मविश्वासात वाढ झाली असली, तरी गुणतालिकेत त्यांच्या स्थितीत मोठा बदल झालेला नाही.

ट्रॅव्हिस हेडची वादळी खेळी

डावाची सुरुवात अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या 3.4 षटकांत 44 धावांची झपाट्याने भागीदारी केली. अभिषेक शर्मा 10 चेंडूत 15 धावा करून बाद झाला, त्याला कार्तिक त्यागीने बाद केले. यानंतर ईशान किशन क्रीजवर आला आणि त्याने ट्रॅव्हिस हेडसोबत डाव सावरला. हेडने 28 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 61 धावांची शानदार खेळी करत अर्धशतक पूर्ण केले. किशननेही 29 चेंडूत 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला सुनील नरेनने बाद केले.

वरुण चक्रवर्तीची प्रभावी गोलंदाजी

या दोघांशिवाय इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. हेनरिक क्लासेन (11) आणि कर्णधार पॅट कमिन्स (10) लवकर बाद झाले. कोलकात्याकडून वरुण चक्रवर्तीने 4 षटकांत 36 धावा देत 3 महत्त्वाचे बळी घेतले. त्याच्यासोबत सुनील नारायण आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेत हैदराबादचा डाव आवरता घेतला.

रहाणेच्या बॅटची जादू अन् रघुवंशीचा राडा

फिन ऍलन आणि अजिंक्य रहाणे यांनी कोलकाता नाईट रायडर्ससाठी डावाची सुरुवात केली. 49 धावांवर संघाला पहिला धक्का बसला. ऍलनने 13 चेंडूंमध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांसह 29 धावा केल्या, पण तो पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर हेनरिक क्लासेनकरवी झेलबाद झाला. त्यानंतर अंगक्रिश रघुवंशी आणि अजिंक्य रहाणे यांनी डाव सावरला. अजिंक्य रहाणेने 36 चेंडूंमध्ये चार चौकार आणि एका षटकारासह 43 धावा केल्या, तर अंगक्रिश रघुवंशीने 47 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि दोन षटकारांसह 59 धावा केल्या. रिंकू सिंगने 22 धावांचे, तर कॅमेरॉन ग्रीनने 3 धावांचे योगदान दिले. सनरायझर्स हैदराबादकडून पॅट कमिन्स, शिवांग कुमार आणि हुसेन साकिब यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

गुणतालिकेतील समीकरण

या सामन्यानंतर आयपीएल 2026 च्या 'पॉइंट्स टेबल'मध्ये काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले. सनरायझर्स हैदराबादला या पराभवाचा मोठा फटका बसला आहे. 10 सामन्यांत 12 गुणांसह ते आता तिसऱ्या क्रमांकावरून आहेत. प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी त्यांना आता पुढच्या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य असेल. तर विजयानंतरही केकेआर आठव्या क्रमांकावर कायम आहे. त्यांच्या खात्यात सध्या 9 सामन्यांत 3 विजय आणि 5 पराभवांसह 7 गुण आहेत.

हे ही वाचा -

Sunil Narine 200 IPL Wickets : 200 NOT OUT! आयपीएलच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते नरेनने करून दाखवलं! हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
KKR vs GT IPL 2026 : केकेआरच्या विजयाने गेम फिरवला! सगळं काही पणाला लावूनही गुजरातचे प्लेऑफचं तिकीट हुकलं, टॉप-4ची रेस झाली आणखी तगडी
केकेआरच्या विजयाने गेम फिरवला! सगळं काही पणाला लावूनही गुजरातचे प्लेऑफचं तिकीट हुकलं, टॉप-4ची रेस झाली आणखी तगडी
KKR vs GT LIVE score IPL 2026 : कोलकात्याच्या 'नाईट्स' समोर टायटन्स सपशेल लोटांगण; केकेआरने गुजरातला चारली पराभवाची धूळ
KKR vs GT LIVE Update : कोलकात्याच्या 'नाईट्स' समोर टायटन्स सपशेल लोटांगण; केकेआरने गुजरातला चारली पराभवाची धूळ
IPL 2026 RCB Playoffs Scenarios : टेबल टॉपवर असूनही RCB जाणार बाहेर? आयपीएलमध्ये समोर आलं धक्कादायक समीकरण, सगळेच चक्रावेल
टेबल टॉपवर असूनही RCB जाणार बाहेर? आयपीएलमध्ये समोर आलं धक्कादायक समीकरण, सगळेच चक्रावेल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
Kalyan Railway station Crime: कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेनची वाट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला पोलिसांकडून अटक
मोठी बातमी: कल्याण रेल्वे स्थानकात खळबळजनक घटना, नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
Rohit Pawar: दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
Embed widget