Kavya Maran SRH vs RR IPL 2026: आयपीएल 2026 च्या (IPL 2026) हंगामात काल सनयाझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात हैदराबादने 57 धावांनी विजय मिळवला. हैदराबादकडून मराठमोळ्या प्रफुल हिंगे (Praful Hinge) तसचे शाकीब हुसैन यांनी प्रत्येकी चार विकेट्स पटकावल्या. यंदाच्या सत्रातील राजस्थानचा हा पहिला पराभव ठरला.
20 षटकांत 6 बाद 216 धावा उभारलेल्या हैदराबादने राजस्थानला 19 षटकांत 158 धावांत गुंडाळले. राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. राजस्थानचे तब्बल तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. यामध्ये वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि ल्वान-द्रे प्रिटोरियसचा समावेश आहे. राजस्थानने 9 धावांवरच 5 विकेट्स गमावल्या होत्या. दरम्यान, हैदराबाद संघाची मालकीन काव्या मारनचा (Kavya Maran) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजस्थानचा आक्रमक खेळाडू वैभव सूर्यवंशी शून्यावर बाद होताच काव्या मारन नाचत सुटली आणि आनंदाने उड्या मारल्या. यावेळी राजस्थान संघाचा मुख्य प्रशिक्षक कुमार संगकाराही काव्या मारनच्या सेलिब्रेशन पाहत बसला. (Kavya Maran SRH vs RR IPL 2026)
सामना कसा राहिला? (SRH vs RR IPL 2026)
पहिल्याच षटकात 3 बाद एक धावा अशी अवस्था झालेल्या राजस्थानचा पराभव येथेच स्पष्ट झाला. पुढच्या षटकात अन्य पदार्पणवीर हुसैनने यशस्वी जैस्वालला बाद करत राजस्थानचे कंबरडे मोडले. अवघ्या 9 धावांत अर्धा संघ गमावलेल्या राजस्थानला रवींद्र जडेजा आणि डोनोवान फेरेरा यांनी सावरत 72 चेंडूंत 118 धावांची भागीदारी केली. मात्र, त्यांची झुंज अपयशीच ठरली. त्याआधी, ईशान किशनने 44 चेंडूंत 91 धावांचा तडाखा देत हैदराबादला भक्कम धावसंख्या उभारून दिली. 20 षटकांत 6 बाद 216 धावा उभारलेल्या हैदराबादने राजस्थानला 19 षटकांत 158 धावांत गुंडाळले आणि या सामन्यात हैदराबादने 57 धावांनी विजय मिळवला.
