Kavya Maran Abrar Ahmed The Hundred Leauge: काव्या मारन (Kavya Maran) यांच्या मालकीच्या सनरायजर्स लीड्स या टीमनं द हंड्रेड 2026 च्या (sunrisers leeds) ऑक्शनमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा फिरकीपटू अबरार अहमद (Abrar Ahmed) याला संघात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. द हंड्रेडमध्ये आयपीएलशी संबंधित संघांच्या फ्रँचायजीकडून पाकिस्तानी खेळाडूंवर बोली लावली जाणार नसल्याची चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. त्यामुळे काव्या मारन आणि सनरायजर्स लीड्सवर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आयपीएलमधील काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएलमधून काढून टाका, अशी मागणी देखील करण्यात येत आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानी खेळाडू अबरार अहमदला विकत घेतल्यामुळे सनरायझर्सला सोशल मीडियावर तीव्र टीकेचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर काव्या मारन आणि सनरायझर्स लीड्स चांगलेच ट्रेंड होत आहे. परंतु 'X' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सनरायझर्स लीड्सचे खाते निलंबित करण्यात आले आहे. जेव्हा कोणी हे खाते उघडण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिथे "Suspended" (निलंबित) अशी सूचना दिसते. या संदर्भात 'X' किंवा फ्रँचायझी या दोघांपैकी कोणीही अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. (Kavya Maran Abrar Ahmed The Hundred Leauge)

अबरार अहमदवर काव्या मारनने किती कोटींची बोली लावली? (Kavya Maran Abrar Ahmed The Hundred Leauge)

अबरार अहमदला सनरायजर्स लीड्सनं 190000 पौंड म्हणजेच जवळपास 2.34 कोटी रुपयांना खरेदी केलं. पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमद याच्यावर सुरुवातीला ट्रेंट रॉकेटसनं बोली लावली होती. त्यांनी अबरार अहमदसाठी  एक लाख पौंड इतकी बोली लावली होती. यानंतर सनरायजर्स लीडसनं 190000 पौंड बोली लावत अबरार अहमदला संघात घेतलं. 

उस्मान तारिकवरही लागली बोली- (Kavya Maran Abrar Ahmed The Hundred Leauge)

'द हंड्रेड'च्या लिलाव यादीमध्ये एकूण 13 पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश होता. त्यापैकी केवळ दोन खेळाडूंसाठी बोली लावली गेली. अबरार अहमदव्यतिरिक्त, 'मिस्ट्री स्पिनर' उस्मान तारिकसाठीही बोली लावली गेली होती. अखेरीस, उस्मानला बर्मिंगहॅम फिनिक्स (Birmingham Phoenix) या फ्रँचायझीने आपल्या संघात घेतले. त्या फ्रँचायझीचा भारताशी कोणताही संबंध नाही. शाहीन आफ्रिदीने यापूर्वीच आपले नाव या लिलावातून मागे घेतले होते.

अबरार अहमदची कारकीर्द- (Kavya Maran Abrar Ahmed The Hundred Leauge)

27 वर्षीय अब्रार अहमदने पाकिस्तानसाठी 38 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 52 विकेट्स आहेत. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत, त्याने 6.67 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे. त्याच्या एकूण टी-20 क्रिकेट कारकिर्दीचा विचार करता, त्याने 84 सामन्यांमध्ये 109 विकेट्स पटकावल्या आहेत. 

संबंधित बातमी:

Abrar Ahmed : पाकिस्तानी अबरार अहमदसाठी काव्या मारनच्या सनरायजर्स लीडसनं मोजले 2.34 कोटी रुपये, द हंड्रेड लीगमध्ये खेळणार