South Africa vs New Zealand Semi Final : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 363 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. केन विल्यमसन आणि रचिन रवींद्र यांच्या शतकांनंतर डेथ ओव्हर्समध्ये डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी तुफानी फटकेबाजी केली. उपांत्य फेरीत न्यूझीलंड संघाने 38 चौकार आणि 5 षटकार मारले. ज्यामुळे त्यांच्या 362 धावा झाल्या. आता जर अंतिम सामन्यात दुबई भारताशी खेळायचे असेल तर दक्षिण आफ्रिकेला लक्ष्य पार करावे लागेल. 

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विल यंग आणि रचिन रवींद्र यांनी संथ सुरुवात केली. पण लवकरच न्यूझीलंडला सुरुवातीलाच विल यंगच्या रूपाने पहिला धक्का बसला, ज्याला लुंगी एनगिडीने आऊट केले. यानंतर, रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना चांगलेच चोपलं. रचिन रवींद्रने शानदार शतक झळकावले, त्याने 101 चेंडूत 108 धावा केल्या. या डावात त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला.

केन विल्यमसनने ठोकले  शतक अन् 19 हजार धावा केल्या पूर्ण

रचिन रवींद्रनंतर केन विल्यमसननेही आपले शतक पूर्ण केले. त्याने 94 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 102 धावा केल्या. यादरम्यान, विल्यमसनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 19 हजार धावाही पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.

ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिशेल यांनी डेथ ओव्हर्समध्ये स्फोटक खेळी  

डॅरिल मिशेलने शेवटच्या षटकांमध्ये शानदार खेळी केली आणि संघाचा धावसंख्या 300 च्या पुढे नेला. पण, त्याच्या अर्धशतक हूकले. तो 37 चेंडूत 49 धावा काढून बाद झाला, या डावात त्याने 4 चौकार आणि 1 षटकार मारला.

हे ही वाचा -

Rachin Ravindra : रचिन रवींद्रनं पाकिस्तानात शतक ठोकलं; इकडं विराट कोहलीची धाकधुक वाढली, ICC टूर्नामेंटमध्ये नव्या किंगचा उदय?