IND vs AUS 3rd T20 : ऑस्ट्रेलियाच्या संघात फेरबदल! ज्या गोलंदाजाने टीम इंडियाला रडवलं, तो पठ्ठ्या तिसऱ्या टी20 सामन्यातून बाहेर; नवख्या खेळाडूची एन्ट्री
Josh Hazlewood Out IND vs AUS 3rd T20 : भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे.

Australia vs India 3rd T20I : भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या दुसऱ्या टी20 मध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांना नकोसा वाटलेला वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड (Josh Hazlewood) आता पुढच्या सामन्यात दिसणार नाही. हेझलवुडने दुसऱ्या टी20 मध्ये पॉवरप्लेदरम्यान चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये 16 चेंडूत एकही धाव न देता तीन विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या घातक गोलंदाजीमुळे भारताचा टॉप ऑर्डर अक्षरशः कोसळला होता.
Josh Hazlewood v Suryakumar Yadav has been elite viewing 🍿#AUSvIND pic.twitter.com/nbpOQhcY4W
— cricket.com.au (@cricketcomau) October 29, 2025
मात्र ऑस्ट्रेलियन कॅम्पकडून मिळालेल्या माहितीनुसार, हेझलवुडला कोणतीही दुखापत नाही. हा निर्णय वर्कलोड मॅनेजमेंटचा एक भाग आहे. मालिकेच्या सुरुवातीला ठरल्याप्रमाणे, हेजलवुड फक्त दोनच सामने खेळणार होता. त्याचा मुख्य भर आता आगामी इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेवर असेल. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियन संघात एक नवख्या माहली बीअर्डमॅन (Mahli Beardman) याला तिसऱ्या टी20 मध्ये संघात स्थान देण्यात आले आहे.
Josh Hazlewood with the POTM award at the MCG. pic.twitter.com/PUb0qpLxf4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 31, 2025
भारताविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघात बदल
माहली बियर्डमन (शेवटच्या तीन सामन्यांसाठी संघात)
जोश हेझलवूड (तिसऱ्या टी-20 साठी संघात नाही)
बेन द्वारशीस (चौथ्या आणि पाचव्या टी-20 मध्ये खेळणार)
भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी ऑस्ट्रेलियाचा संघ :
मिशेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट, झेवियर बार्टलेट, महली बियर्डमन, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), मॅथ्यू कुहनेमन, मिशेल ओवेन, जोश फिलिप (यष्टिरक्षक), मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, अॅडम झांपा.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्यांचे वेळापत्रक :
तिसरा टी-20 : 2 नोव्हेंबर - दुपारी, बेलेरिव्ह ओव्हल
चौथा टी-20 : 6 नोव्हेंबर - दुपारी, हेरिटेज बँक स्टेडियम
पाचवा टी-20 : 8 नोव्हेंबर - दुपारी, गाब्बा स्टेडियम
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, रिंकू सिंग, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
हे ही वाचा -
















