Jemimah Rodrigues Shares Hug With Pakistan Cricketer Fatima Sana : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे फक्त खेळ नव्हे, तर भावना, उत्सुकता आणि प्रचंड दडपण यांचा संगम असतो. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील राजकीय तणावाचा परिणाम क्रिकेटच्या मैदानावरही स्पष्टपणे दिसून आला आहे. विशेषतः अलीकडील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या कर्णधारांनी पारंपरिक प्री-मॅच आणि पोस्ट-मॅच हस्तांदोलन टाळल्यामुळे त्यावर मोठी चर्चा झाली होती.

Continues below advertisement

मात्र, इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड विमेन्स लीगमध्ये एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. भारताची स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स आणि पाकिस्तानची महिला संघाची कर्णधार फातिमा सना यांनी सामना संपल्यानंतर एकमेकींना हस्तांदोलन केले. दोघींनी प्रथम हस्तांदोलन केले आणि त्यानंतर एकमेकींना मिठी मारली. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सदर्न ब्रेव्ह्सचा दमदार विजय

Continues below advertisement

साऊथॅम्प्टनच्या द रोज बाउल मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सदर्न ब्रेव्ह्स संघाने बर्मिंगहॅम फिनिक्सचा 24 धावांनी पराभव केला. सामन्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांचे अभिनंदन केले. याचवेळी जेमिमा आणि फातिमा समोरासमोर आल्या. त्यांनी प्रथम हँडशेक केला आणि त्यानंतर एकमेकींना मिठी मारत खेळाडूवृत्तीचे उदाहरण घालून दिले.

या क्षणाची एवढी चर्चा का?

जेमिमा आणि फातिमा यांची ही भेट विशेष ठरली कारण गेल्या वर्षभरात भारत-पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अशा प्रकारचे दृश्य जवळपास पाहायला मिळाले नव्हते. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये दोन्ही संघांच्या कर्णधारांनी पारंपरिक हँडशेक टाळल्याने त्यावर सातत्याने चर्चा रंगली होती. या चर्चेला 2025 च्या आशिया कपदरम्यान सुरुवात झाली. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये सामन्यापूर्वी तसेच सामन्यानंतर हस्तांदोलन झाले नव्हते. त्यानंतरही हा क्रम कायम राहिला.

अनेक स्पर्धांमध्ये हँडशेक झाला नव्हता

अंडर-19 विश्वचषक 2026मध्ये भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे आणि पाकिस्तानचा फरहान युसूफ यांनी नाणेफेकीवेळी हस्तांदोलन केले नव्हते. आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026मध्ये सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा यांच्यातही हँडशेक झाले नव्हते. महिला टी-20 विश्वचषक 2026मध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानची फातिमा सना यांनीही पारंपरिक हस्तांदोलन टाळले होते. पण, आंतरराष्ट्रीय स्तरावर वातावरण कितीही तणावपूर्ण असले, तरी फ्रँचायझी क्रिकेटमध्ये विविध देशांतील खेळाडू एकाच संघातून खेळतात. त्यामुळे त्यांच्यातील नाते, परस्पर आदर आणि मैत्री कायम असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

हे ही वाचा -

Netherlands Captain News : वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?