IND W vs AUS W ICC Women's World Cup Semifinal : भारतीय महिला क्रिकेट संघाने असे अप्रतिम कामगिरी करून दाखवली आहे, ज्याची अपेक्षा कदाचित कुणालाही नव्हती. महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. 339 धावांचे लक्ष्य भारतीय महिलांनी 9 चेंडू शिल्लक असताना आणि 5 गडी राखून गाठले. या विजयाची सर्वात मोठी नायिका ठरली तर ती म्हणजे जेमिमा रॉड्रिग्ज. तिने आपल्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय खेळी करत 127 धावांची नाबाद शतकी खेळी साकारली. तिच्या या धडाकेबाज फलंदाजीने ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा घमेंड अक्षरशः गुडघ्यावर आणला.
सुरुवातीला भारताने काही जलद गडी गमावले होते, पण कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाने संघाला स्थिरता दिली. हरमनप्रीतने 89 धावा करत महत्वाची भागीदारी निभावली, तर जेमिमाने शेवटपर्यंत लढत सामना भारताच्या झोळीत घातला. विजयाचा क्षण गाठताच जेमिमा रॉड्रिग्ज भावनिक झाली आणि मैदानातच तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सहकाऱ्यांनी तिच्या भोवती धाव घेत तिचा विजय साजरा केला. सोशल मीडियावर जेमिमाच्या या भावनिक क्षणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
जेमिमा रॉड्रिग्ज निधड्या छातीने लढली
ऑस्ट्रेलिया गेल्या 8 वर्षांनंतर पहिल्यांदाच विश्वचषकातील सामना हरला आहे. याशिवाय, विश्वचषकाच्या नॉकआउट फेरीत इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग यापूर्वी कोणत्याही संघाने केला नव्हता. या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जने उपांत्य फेरीत नाबाद 127 धावांची अफलातून खेळी केली. उजव्या हाताच्या या फलंदाजीनं 134 चेंडूत 14 चौकार लगावले आणि 94.78 असा स्ट्राईक रेट राखला. भारताने दुसऱ्या षटकातच शेफाली वर्माचा विकेट गमावला, आणि त्यानंतर जेमिमा मैदानात उतरली. ती आली आणि सामना आपल्या नियंत्रणात घेतला. सिंगल-डबल्सच्या बरोबरच तिने चौकारांची आतषबाजी केली. जेमिमाने 57 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि 115 चेंडूत शतक गाठले.
ही तिची वनडे कारकिर्दीतील तिसरी शतकी खेळी असून, या वर्षीच तिने सर्व तीन शतके झळकावली आहेत. हरमनप्रीत कौरसोबत केलेल्या शतकी भागीदारीमुळे भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आला. तिच्या या धडाकेबाज कामगिरीसाठी जेमिमाला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू (Player of the Match) म्हणून गौरविण्यात आले.
हे ही वाचा -