Jaydev Unadkat : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून (IND vs BAN Test Series) तब्बल 12 वर्षांनंतर भारताच्या कसोटी संघात डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) पुनरागमन करत आहे. पण पहिल्या कसोटीपूर्वी व्हिसा न मिळाल्याने जयदेव बांगलादेशला पोहचू शकला नाही. पण गुरुवारी (15 डिसेंबर) जयदेव बांगलादेशला पोहोचला असून कसोटी संघासोबत सामील झाला आहे. मोहम्मद शमीच्या जागी त्याला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. दरम्यान जयदेव बांगलादेशला पोहोचल्यावर टीम इंडियाने त्याचे जोरदार स्वागत केले.


यादरम्यान बीसीसीआयने ट्वीट करत फोटोही पोस्ट केला आहे. ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, Hey जयदेव उनाडकट, टीम इंडियामध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे. दरम्यान बांगलादेशला वेळेत पोहोचू न शकल्याने जयदेव पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. कसोटी संघात समावेश केल्यानंतर उनाडकटने सर्वांचे आभार मानले असून बीसीसीआयनं फोटो पोस्ट करत जयदेवचं स्वागत केलं आहे.


बीसीसीआयचं जयदेवसाठी वेलकम ट्वीट






शमीची दुखापत आणि जयदेवला संधी


भारताचा आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शामी दुखापतीमुळं बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून बाहेर पडलाय. त्याच्या जागी जयदेव उनाडकटचा भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला. 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जयदेव उनाडकट भारतीय कसोटी संघाचा भाग बनलाय. त्यानं 2010 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये एकमेव कसोटी खेळली होती. जयदेवनं भारतासाठी आतापर्यंत 1 कसोटी, 7 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.


पहिल्या कसोटी भारत आघाडीवर


झहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये (Zahur Ahmed Chowdhury Stadium) पहिला कसोटी सामना सुरु असून सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघ 404 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या संघाला दुसऱ्या दिवसाखेर 133 धावांवर 8 विकेट्स गमावले.बांगलादेशकडून मुशफिकूर रहीमनं (Mushfiqur Rahim) सर्वाधिक 28 धावांची खेळी केली. मेहंदी हसन (Mehidy Hasan Miraz) आणि इबादत हुसेन (Ebadot Hossain) क्रीजवर उपस्थित आहेत. भारताकडून कुलदीप यादवनं (Kuldeep Yadav) चमकदार गोलंदाजी केली.


हे देखील वाचा-