Team India Squad Vs Sri Lanka Test Series Update Marathi News : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतर्गत होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या 15 सदस्यीय संघात अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचे पुनरागमन झाले असून, मध्य प्रदेशचा फिरकी अष्टपैलू सारांश जैन हा एकमेव नवा चेहरा म्हणून संघात समाविष्ट झाला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान गोल येथे खेळवला जाईल, तर दुसरा कसोटी सामना 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान कोलंबोच्या एसएससी (SSC) मैदानावर पार पडेल.

Continues below advertisement

4 खेळाडू IN, 3 खेळाडू OUT (Team India Squad Vs Sri Lanka Test Series)

मागील कसोटी मालिकेच्या तुलनेत निवड समितीने भारतीय संघात चार महत्त्वाचे बदल केले आहेत. रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांच्या व्यतिरिक्त प्रसिद्ध कृष्णा आणि नवोदित सारांश जैन यांनी संघात प्रवेश मिळवला आहे. दुसरीकडे, वाशिंग्टन सुंदर, नीतीश कुमार रेड्डी आणि हर्ष दुबे या तीन खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे. विदर्भाकडून खेळणाऱ्या हर्ष दुबेला अवघ्या एका मालिकेनंतर संघातून का वगळले, याबद्दल निवड समितीकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

Continues below advertisement

बुमराह आणि साई सुदर्शन फिटनेसच्या अटीवर

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि आघाडीच्या क्रमातील फलंदाज बी. साई सुदर्शन यांचा 15 जणांच्या संघात समावेश करण्यात आला असला, तरी त्यांचे खेळणे 'बीसीसीआय'च्या (BCCI) सेंटर ऑफ एक्सलन्सकडून (CoE) मिळणाऱ्या फिटनेस मंजुरीवर अवलंबून असेल. तसेच, या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान दुखापतग्रस्त झालेला अष्टपैलू खेळाडू वाशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीच्या निवडीसाठी उपलब्ध नव्हता.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ- (Team India Squad vs Sri Lanka Test Series)

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन.

भारत आणि श्रीलंकेत दोन सामन्यांची कसोटी मालिका- (Ind vs SL Test Series 2026)

भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना 15 ऑगस्ट 2026 ते 19 ऑगस्ट 2026 रोजी तर दुसरा कसोटी सामना 23 ऑगस्ट 2026 ते 27 ऑगस्ट 2026 ला खेळवण्यात येणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 च्या पार्श्वभूमीवर भारतासाठी हा महत्वाचा दौरा असेल.

हे ही वाचा -

Team India Squad vs Sri Lanka Test Series: रवींद्र जडेजा, सारांश जैन IN, वॉशिंग्टन OUT; श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर