Japan vs India One-off T20I Update : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारत आणि जपान यांच्यातील एकमेव टी-20 आंतरराष्ट्रीय सामना सानो इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जात आहे. पावसामुळे आणि मैदान ओले असल्यामुळे, सामना प्रत्येक संघासाठी पाच षटकांचा करण्यात आला आहे. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताच्या डावाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा अवघ्या एका चेंडूचा सामना करून शून्यावर बाद झाला. जपानचा वेगवान गोलंदाज चार्ली हारा हिन्झे याने अभिषेकला बाद करत भारताला सुरुवातीलाच मोठा धक्का दिला.

Continues below advertisement

अभिषेकने चार्ली हारा हिन्झेच्या गोलंदाजीवर फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडूवर योग्य नियंत्रण मिळवता आले नाही आणि शोमा सुगाया स्लेटरने झेल घेत अभिषेकचा डाव संपवला. पहिल्या षटकात अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला.

भारताला दुसरा धक्का, संजूही माघारी

Continues below advertisement

अभिषेकच्या विकेटनंतर संजू सॅमसनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र संजूचीही खेळी फार काळ टिकली नाही. इब्राहिम ताकाहाशीच्या गोलंदाजीवर बेंजामिन इटो-डेव्हिसने त्याचा झेल घेतला. संजूने 7 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने 9 धावा केल्या. यानंतर इशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर भारताची अवस्था 2 बाद 12 धावा अशी आहे.  

जपानच्या गोलंदाजांनी भारताला दिला धक्का

जपानच्या गोलंदाजांनी पहिल्या तीन षटकांत भारताला तीन धक्के दिले. पहिल्याच षटकात अभिषेक शर्मा खाते न उघडताच बाद झाला. दुसऱ्या षटकात संजू सॅमसनही बाद झाला. इब्राहिम तकाहाशीच्या गोलंदाजीवर बेंजामिनने त्याचा झेल घेतला. यानंतर, तिसऱ्या षटकात बेंजामिन डेव्हिसने इशान किशनला माकोटोकरवी झेलबाद केले. इशान केवळ तीन धावाच करू शकला. सध्या तिलक वर्मा आणि श्रेयस अय्यर खेळपट्टीवर आहेत.

वैभव सूर्यवंशी सामन्यातून बाहेर

कर्णधार श्रेयस अय्यरने या सामन्यात वैभव सूर्यवंशीला खेळवले नाही. त्याला सामन्यातून वगळण्यात आले. सूर्यवंशीचा प्लेइंग-11 मध्ये समावेश नसल्यामुळे, त्याला खेळताना पाहू इच्छिणारे भारतीय क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. यापूर्वी, अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतूनही वैभवला वगळण्यात आले होते. आता, वैभव सूर्यवंशीच्या अनुपस्थितीमुळे त्याचे चाहते निराश झाले आहेत. हे ही वाचा -

Shafali Verma News : शेफाली वार्मचा धुमाकूळ! एकाच सामन्यात मोडले दोन मोठे विक्रम, क्रिकेटचा इतिहास भूगोलच बदलून टाकला