IPL Play Off Qualification Scenario In Marathi : आयपीएल 2026 आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून प्लेऑफची शर्यत अधिकच रंगतदार झाली आहे. प्रत्येक सामना आता संघांचं भविष्य ठरवणारा ठरत आहे. हैदराबादवर दणदणीत विजय मिळवत गुजरात टायटन्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे, तर सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. गुजरातने 16 गुणांसह प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित केलं असून उर्वरित दोन सामने जिंकून टॉप-2 मध्ये राहण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांचे 14-14 गुण असून ते अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. टॉप-3 व्यतिरिक्त पंजाब किंग्स, चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. आतापर्यंत लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स फक्त दोन संघ स्पर्धेबाहेर गेले आहेत.
गुजरात टायटन्सची प्लेऑफमध्ये जवळपास एन्ट्री
सनरायझर्स हैदराबादचा 82 धावांनी पराभव करत गुजरात टायटन्स 16 गुणांपर्यंत पोहोचणारा पहिला संघ ठरला. अजून दोन सामने बाकी असल्याने गुजरातला टॉप-2 मध्ये फिनिश करण्याची मोठी संधी आहे. गुजरातशिवाय आणखी पाच संघ प्लेऑफच्या स्पर्धेत आहेत. विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांच्या टॉप-4 मध्ये पोहोचण्याच्या शक्यता अनुक्रमे 42.7% आणि 41.8% इतक्या आहेत.
SRH प्लेऑफ समीकरण
सनरायझर्स हैदराबादचे अजून दोन सामने बाकी असून प्लेऑफमध्ये स्थान पक्कं करण्यासाठी त्यांना किमान एक विजय आवश्यक आहे.
उर्वरित सामने :
- 18 मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध
- 22 मे – आरसीबी विरुद्ध
RCB प्लेऑफ समीकरण
आरसीबीने 11 सामन्यांत 7 विजय आणि 4 पराभवासह 14 गुण मिळवले आहेत. सध्या संघ दुसऱ्या स्थानावर असून उर्वरित 3 पैकी फक्त एक सामना जिंकला तरी प्लेऑफ जवळपास निश्चित होईल.
उर्वरित सामने :
- 13 मे – कोलकाता विरुद्ध
- 17 मे – पंजाब किंग्स विरुद्ध
- 22 मे – हैदराबाद विरुद्ध
पंजाब किंग्स प्लेऑफ समीकरण
पंजाब किंग्सच्या खात्यात 11 सामन्यांत 13 गुण आहेत. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना उरलेल्या 3 पैकी किमान 2 सामने जिंकावे लागतील.
उर्वरित सामने :
- 14 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध
- 17 मे – आरसीबी विरुद्ध
- 23 मे – लखनऊ विरुद्ध
CSK प्लेऑफ समीकरण
चेन्नई सुपर किंग्सने खराब सुरुवातीनंतर शानदार पुनरागमन केलं आहे. 11 सामन्यांत 12 गुणांसह असलेल्या CSK ला उर्वरित 3 पैकी 2 सामने जिंकणं गरजेचं आहे.
उर्वरित सामने :
- 15 मे – लखनऊ विरुद्ध
- 18 मे – हैदराबाद विरुद्ध
- 21 मे – गुजरात टायटन्स विरुद्ध
राजस्थान रॉयल्स प्लेऑफ समीकरण
राजस्थान रॉयल्सच्या खात्यात 11 सामन्यांत 12 गुण आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांनाही उर्वरित 3 पैकी 2 सामने जिंकावे लागतील.
उर्वरित सामने :
- 17 मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध
- 19 मे – लखनऊ विरुद्ध
- 24 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध
दिल्ली आणि लखनऊ स्पर्धेबाहेर गेले असले तरी राजस्थानचा खेळ बिघडवू शकतात. क्वालिफायर-1 जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. पराभूत संघाला क्वालिफायर-2 मध्ये एलिमिनेटर विजेत्याविरुद्ध संधी मिळेल. क्वालिफायर-1 हा गुणतालिकेतील टॉप-2 संघांमध्ये होईल, तर एलिमिनेटर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांमध्ये रंगणार आहे.
हे ही वाचा -
