IPL 2026 Points Table Update Marathi : आयपीएल 2026 मध्ये 4 एप्रिल शनिवारी डबल हेडर सामने खेळवण्यात आले. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर शानदार विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला पराभूत करत महत्त्वाचे दोन गुण मिळवले. या दोन्ही सामन्यांच्या निकालानंतर गुणतालिकेत मोठे बदल पाहायला मिळाले. 

Continues below advertisement

राजस्थान टेबल टॉपर, तर दिल्लीने ठोकला शड्डू (IPL 2026 Points Table Update)

राजस्थान रॉयल्स पुन्हा एकदा अव्वल स्थानावर पोहोचली असून दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. सलग दोन विजयांसह पंजाब किंग्स तिसऱ्या स्थानावर आहे, तर एक सामना जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चौथ्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबादने एक विजय आणि एक पराभवासह पाचवे स्थान मिळवले आहे.

Continues below advertisement

टॉप-5 मधून मुंबई OUT

दुसरीकडे, या पराभवानंतर मुंबई इंडियन्स टॉप 5 मधून बाहेर पडत सहाव्या स्थानावर घसरली आहे. गुजरात टायटन्सलाही सलग दुसऱ्या पराभवाचा फटका बसला असून ते सातव्या क्रमांकावर घसरले आहेत.

ऑरेंज-पर्पल कॅपच्या शर्यतीत मोठे उलटफेर (IPL 2026 Orange Cap and Purple Cap)

ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप शर्यतीबाबत बोलायचे झाल्यास, पहिल्या सामन्यात दमदार फलंदाजी करणाऱ्या समीर रिझवीने दिवसाअखेर अव्वल फलंदाज म्हणून स्थान पटकावले असून सध्या ऑरेंज कॅप त्याच्याकडे आहे. तर गुजरातविरुद्ध चार विकेट्स घेत उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या रवि बिश्नोईने पर्पल कॅपवर घेतली. विजयकुमार वैशाखच्याही नावावर 5 विकेट्स असल्या, तरी सरासरीच्या आधारावर बिश्नोई सध्या अव्वल स्थानी आहे. 

IPL 2026 Points Table Update

टीम (संघ)सामनेविजयपराभवगुणनेट रन रेट
राजस्थान रॉयल्स2204+2.233
दिल्ली कॅपिटल्स2204+1.170
पंजाब किंग्स2204+0.637
आरसीबी (RCB)1102+2.907
सनरायझर्स हैदराबाद2112+0.469
मुंबई इंडियन्स2112-0.206
गुजरात टायटन्स2020-0.424
लखनऊ सुपर जायंट्स1010-1.397
केकेआर (KKR)2020-1.964
चेन्नई सुपर किंग्स2020-2.562

आयपीएल 2026 ऑरेंज कॅप

खेळाडूसामनेडावधावा
समीर रिझवी22160
रोहित शर्मा22113
कूपर कोनोली22108
अंगकृष रघुवंशी22103
इशान किशन2294

आयपीएल 2026 पर्पल कॅप

खेळाडूसामनेविकेट्ससरासरीधावा
रवि बिश्नोई2511.457
विजयकुमार वैशाख2514.472
टी नटराजन2413.2553
लुंगी एनगिडी2415.2561
जयदेव उनादकट2412.550

हे ही वाचा - 

GT vs RR IPL 2026 : राजस्थानचा 'रॉयल' विजय! गुजरातच्या घरात घुसून लोळवलं, शेवटच्या षटकात राशिद खानने बॅट फिरवली, पण तुषार देशपांडे ठरला हिरो