IPL 2026 Points Table Latest Updates : आयपीएल 2026 मध्ये दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. मात्र सोमवारी (6 एप्रिल) कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर होणारा कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला. सामन्याची सुरुवात वेळेत झाली खरी, पण केवळ 3.4 ओव्हर झाल्यानंतरच पावसाने हजेरी लावली. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र पावसामुळे खेळ थांबवावा लागला.

Continues below advertisement

तरीही IPL च्या पॉइंट्स टेबलमध्ये उलथापालथ

दीर्घ प्रतीक्षेनंतर कमी षटकांचा सामना खेळवण्याचा प्रयत्न झाला, पण सतत पडणाऱ्या पावसामुळे तेही शक्य झाले नाही. अखेर सामना रद्द घोषित करण्यात आला. त्या वेळी केकेआरने 3.4 षटकांत 2 बाद 25 धावा केल्या होत्या. सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आले. त्यामुळे केकेआरचे खाते उघडले असून संघ आता गुणतालिकेत आठव्या स्थानावर पोहोचला आहे.

Continues below advertisement

दोन संघांनी अजून खातेही उघडले नाही

दरम्यान, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांचे अजूनही खाते उघडलेले नाही. गुजरातने दोन सामने खेळले असून चेन्नईने तीन, पण दोघांनाही अजून विजय मिळालेला नाही. या एका गुणामुळे पंजाब किंग्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. पंजाबने तीनपैकी दोन सामने जिंकले असून एक सामना रद्द झाला आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यात 5 गुण झाले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या, तर राजस्थान रॉयल्स तिसऱ्या स्थानावर आहेत. दिल्ली कॅपिटल्स चौथ्या क्रमांकावर असून या सर्व संघांच्या खात्यात प्रत्येकी 4 गुण आहेत. याशिवाय सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्या खात्यात प्रत्येकी 2 गुण आहेत.

IPL 2026 Points Table Latest -

संघसामनेविजयपराभवअनिर्णितगुणNRR
पंजाब किंग्स320150.637
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू220042.501
राजस्थान रॉयल्स220042.233
दिल्ली कॅपिटल्स220041.17
सनरायझर्स हैदराबाद312020.275
मुंबई इंडियन्स21102-0.206
लखनऊ सुपर जायंट्स21102-0.542
कोलकाता नाईट रायडर्स30211-1.964
गुजरात टायटन्स20200-0.424
चेन्नई सुपर किंग्स30300-2.517

हे ही वाचा -

SRK KKR IPL 2026 : किंग खानचा पारा चढला! सीईओची भर मैदानात शाळा; केकेआरच्या खराब कामगिरीचा हिशोब चुकता करणार?