IPL 2026 Playoff Qualification Scenarios : आयपीएल 2026 चा लीग स्टेज आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून 24 मे रोजी शेवटचा साखळी सामना खेळवला जाणार आहे. आता फक्त 11 सामने बाकी आहेत आणि त्यानंतर प्लेऑफचं चित्र स्पष्ट होणार आहे. सामन्यांची संख्या कमी होत असली तरी अजूनही तब्बल आठ संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांचं आव्हान संपुष्टात आलं असलं, तरी उर्वरित आठ संघ अजूनही आशा जिवंत ठेवून आहेत.
हे अखेरचे 11 सामनेच ठरवणार आहेत की प्लेऑफमध्ये कोणते चार संघ पोहोचणार आहेत. गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांवर राहणारे संघ क्वालिफायर-1 मध्ये आमनेसामने भिडतील. त्या सामन्याचा विजेता थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळवला जाईल.
एलिमिनेटर जिंकणारा संघ आणि क्वालिफायर-1 मध्ये पराभूत झालेला संघ क्वालिफायर-2 मध्ये भिडतील. त्या सामन्याचा विजेता अंतिम फेरीत स्थान मिळवेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे आठ संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत.
8 संघांमधील प्लेऑफची जबरदस्त शर्यत
RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे सध्या 16 गुण आहेत. उरलेल्या दोन सामन्यांपैकी एक सामना जरी जिंकला तरी त्यांचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित होईल.
GT : गुजरात टायटन्सची परिस्थितीही आरसीबीसारखीच आहे. त्यांच्याकडेही 16 गुण आहेत. पुढील दोन सामन्यांपैकी एक विजय मिळाला तरी गुजरात प्लेऑफमध्ये पोहोचेल.
SRH : सनरायझर्स हैदराबादने 12 सामन्यांत 14 गुण मिळवले आहेत. साधारणपणे 16 गुण प्लेऑफसाठी पुरेसे ठरतात. एसआरएचने उरलेले दोन्ही सामने जिंकले तर कोणावरही अवलंबून न राहता संघ प्लेऑफमध्ये जाईल. मात्र एकच सामना जिंकला तर इतर निकालांवर लक्ष ठेवावं लागेल.
PBKS : पंजाब किंग्स सलग पाच सामने हरली आहे. संघाकडे सध्या 13 गुण आहेत. सुरक्षितपणे प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर पुढील दोन्ही सामने जिंकणं त्यांच्यासाठी अत्यावश्यक आहे. एक सामना हरल्यास पंजाबचं आव्हान धोक्यात येऊ शकतं.
RR : राजस्थान रॉयल्सचे अजून तीन सामने बाकी आहेत. हे तिन्ही सामने जिंकले तर राजस्थानला प्लेऑफमध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. मात्र दोन विजय त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
CSK : चेन्नई सुपर किंग्स कठीण परिस्थितीत अडकली आहे. सध्या संघाकडे 12 गुण आहेत. उरलेले दोन्ही सामने जिंकूनही सीएलकेला इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावं लागणार आहे.
DC : दिल्ली कॅपिटल्सने 12 सामन्यांत फक्त 10 गुण मिळवले आहेत. उरलेले दोन्ही सामने जिंकले तरी त्यांचे जास्तीत जास्त 14 गुण होतील. त्यामुळे दिल्लीच्या प्लेऑफच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.
KKR : कोलकाता नाईट रायडर्सची स्थितीही ‘जर-तर’वर टिकून आहे. 11 सामन्यांत संघाकडे 9 गुण आहेत आणि ते जास्तीत जास्त 15 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. पुढील तिन्ही सामने जिंकले तरी केकेआरला इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावं लागणार आहे.
हे ही वाचा -
