IPL 2026 Playoff Qualification Scenarios For All Teams : आयपीएल 2026 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ची विजयी घोडदौड थांबण्याचं नाव घेत नाहीये. 8 मे रोजी अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात केकेआरने यजमान दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 8 गडी राखून धुव्वा उडवला. या सलग चौथ्या विजयामुळे केकेआरने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. केकेआरच्या या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठी खळबळ उडाली असून, दिल्लीसह मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्सचं प्ले-ऑफचं स्वप्न जवळपास धुळीस मिळालं आहे.

Continues below advertisement

आयपीएल 2026 प्ले-ऑफची समीकरणं काय सांगतात?

1. सनरायझर्स हैदराबाद (SRH)

Continues below advertisement

हैदराबादचा संघ सध्या 11 सामन्यांत 14 गुणांसह सर्वात आघाडीवर आहे. प्ले-ऑफचं तिकीट पक्कं करण्यासाठी त्यांना उरलेल्या 3 सामन्यांपैकी फक्त 1 विजय हवा आहे. त्यांची नजर आता 'टॉप-2' मध्ये राहण्यावर असेल.

2. पंजाब किंग्स (PBKS) 

सुरुवातीच्या 7 पैकी 6 सामने जिंकणाऱ्या पंजाबची गाडी आता अडखळली आहे. सलग 3 पराभवांमुळे त्यांच्याकडे 10 सामन्यांत 13 गुण आहेत. सुरक्षित राहण्यासाठी त्यांना 4 पैकी 2 सामने जिंकावेच लागतील.

3. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) 

आरसीबीनेही सलग 2 सामने गमावले आहेत. 10 सामन्यांत 12 गुणांसह ते तिसऱ्या स्थानी आहे, तरी उरलेल्या 4 पैकी किमान 2 विजय त्यांना आवश्यक आहेत.

4. राजस्थान रॉयल्स (RR) 

गेल्या 6 पैकी 4 सामने गमावल्यामुळे राजस्थान अडचणीत आली आहे. 10 सामन्यांत 12 गुण असलेल्या राजस्थानला 16 गुणांचा टप्पा गाठण्यासाठी 4 पैकी 2 विजय मिळवणं अनिवार्य आहे. 5. गुजरात टायटन्स (GT) 

गुजरातने विजयाची हॅट्ट्रिक करत जोरदार पुनरागमन केलं आहे. 10 सामन्यांत 12 गुणांसह गुजरात हा असा एकमेव संघ आहे, जो वरच्या चार संघांची गणितं बिघडवू शकतो. त्यांनाही किमान 2 विजयांची गरज आहे.

6. चेन्नई सुपर किंग्स (CSK) 

सीएसकेचा प्रवास यंदा हेलकावे खाणारा राहिला आहे. 10 सामन्यांत 10 गुण असून त्यांच्याकडे अजून 18 गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. पण, इथून एकही चूक त्यांना महागात पडू शकते.

7. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) – फिनिक्स भरारी!

सुरुवातीच्या 6 पैकी 5 सामने गमावणारा हा संघ आता 'जायंट किलर' ठरत आहे. सलग 4 विजयांसह केकेआर 9 गुणांवर पोहोचली आहे. जर त्यांनी उरलेले 4 सामने जिंकले, तर ते 17 गुणांसह थेट क्वालिफाय करू शकतात. पण एकही हार त्यांचं स्वप्न मोडू शकते.

कोणाचं 'पॅकअप' झालं?

दिल्ली कॅपिटल्स, 5 वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स या तिन्ही संघांचा पत्ता जवळपास कट झाला आहे. हे संघ आता जास्तीत जास्त 14 गुणांपर्यंतच पोहोचू शकतात, जे प्ले-ऑफसाठी अपुरे ठरण्याची शक्यता 99% आहे.  हे ही वाचा -

KKR vs DC IPL 2026 : फिन ॲलनचं वादळी शतक! केकेआरचा सलग चौथा विजय, दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास OUT