एक्स्प्लोर

IPL 2026 Mini Auction: आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात 'हे' 5 अष्टपैलू खेळाडू ठरणार मोठे दावेदार; कोट्यवधी रुपयांची बोली लागणार?

IPL 2026 Mini Auction: आयपीएल 2026 चा मिनी-लिलाव 16 डिसेंबर 2025 रोजी अबू धाबी येथे होणार आहे. या लिलावात संघ काही अष्टपैलू खेळाडूंसाठी कोट्यवधी रुपयांची बोली लावू शकतात.

IPL 2026 Mini Auction: इंडियन प्रीमियर लीगचा 19 वा हंगाम 2026 मध्ये होणार असून, काहीच आठवड्यांत  याबाबत मिनी ऑक्शन (IPL 2026 Mini Auction) आयोजित केले जाणार आहे. सर्व फ्रँचायझी आपल्या संघाला मजबूत करण्यासाठी सज्ज आहेत. या मिनी ऑक्शनमध्ये फ्रँचायझी अशा स्टार ऑलराउंडर्सवर कोट्यवधी रुपयांची बोली लावू शकतात, जे फलंदाजीसह बॉलिंगमध्येही कमाल करू शकतात. अशा खेळाडूंची शोध टीम्स नेहमी घेत असतात, कारण हे एकटेच सामन्याचा कल बदलू शकतात. या पार्श्वभूमीवर पाच ऑलराउंडर्सवर या मिनी ऑक्शनमध्ये कोट्यवधी रुपयांची बोली लागण्याची शक्यता आहे.

Michael Bracewell: मायकेल ब्रेसवेल (न्यूझीलंड)

न्यूझीलंडचा ऑलराउंडर मायकेल ब्रेसवेल या IPL 2026 च्या मिनी ऑक्शनमध्ये सर्वात चर्चेतल्या ऑलराउंडर्सपैकी एक आहे. ब्रेसवेल हा डाव्या हाताचा चांगला फलंदाज असून ऑफ स्पिन गोलंदाजही आहे. ब्रेसवेलने अखेर IPL 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी 5 सामने खेळले होते. यात त्याने 58 धावा केल्या आणि 6 विकेट्स घेतल्या. तर, न्यूझीलंडसाठी T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 42 T20 सामन्यांत एकूण 417 धावा केल्या आणि 33 विकेट्स घेतल्या आहेत.

Sikandar Raza: सिकंदर रजा (झिम्बाब्वे)

झिम्बाब्वेचा अनुभवी ऑलराउंडर सिकंदर रजा IPL 2026 च्या मिनी ऑक्शनमध्ये दुसऱ्या सर्वात चर्चित ऑलराउंडर्सपैकी एक आहे. सिकंदरने IPL 2023 आणि 2024 मध्ये पंजाब किंग्ससाठी खेळले असून या दोन सिझनमध्ये त्याने 9 सामने खेळत 182 धावा केल्या आणि 3 विकेट्स घेतल्या. तर, झिम्बाब्वेसाठी सिकंदरने 127 T20 सामन्यांत एकूण 2,883 धावा केल्या आणि 102 विकेट्सही मिळवल्या आहेत. रजा आपली फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हींनी सामन्याचा कल बदलण्याची क्षमता ठेवतो. त्याची ऑफ-स्पिन गोलंदाजी आणि मध्यक्रमातील आक्रमक फलंदाजीने तो विरोधी संघाचा अक्षरशः घाम फोडतो.

Matthew Short: मैथ्यू शॉर्ट (ऑस्ट्रेलिया)

ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर मैथ्यू शॉर्ट IPL 2026 च्या मिनी ऑक्शनमध्ये तिसऱ्या सर्वात चर्चित ऑलराउंडर्सपैकी एक आहे. मैथ्यूने IPL 2023 मध्ये पंजाब किंग्ससाठी 6 सामने खेळले, यात त्याने एकूण 117 धावा केल्या. तर, ऑस्ट्रेलियासाठी 19 T20 सामन्यांत शॉर्टने एकूण 357 धावा केल्या आणि 8 विकेट्सही मिळवल्या आहेत. शॉर्टची टॉप-ऑर्डरमधील आक्रमक फलंदाजी आणि ऑफ-स्पिन गोलंदाजी त्याला T20 क्रिकेटसाठी एक उत्कृष्ट ऑलराउंडर बनवते.

Saransh Jain: सारांश जैन (भारत) 

भारतीय घरगुती क्रिकेटमधील मध्य प्रदेशचा सारांश जैन IPL 2026 च्या मिनी ऑक्शनमध्ये चौथ्या सर्वात चर्चित ऑलराउंडर्सपैकी एक आहे. सारांशने रणजी ट्रॉफी 2025-26 मध्ये शानदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने रणजीच्या फक्त दोन सामन्यांत एक शतक ठोकले आणि 7 विकेट्स मिळवल्या आहेत. या कामगिरीमुळे सारांश जैनवर IPL 2026 च्या मिनी ऑक्शनमध्ये मोठी बोली लागू शकते. 

Jason Holder: जेसन होल्डर (वेस्टइंडीज)

वेस्टइंडीजचा अनुभवी ऑलराउंडर जेसन होल्डर IPL 2026 च्या मिनी ऑक्शनमध्ये पाचव्या सर्वात चर्चित ऑलराउंडर्सपैकी एक आहे. होल्डर IPL मध्ये पाच वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी खेळले असून 46 सामन्यांत त्याने एकूण 259 धावा केल्या आणि 53 विकेट्स घेतल्या आहेत. तर, वेस्टइंडीजसाठी खेळताना होल्डरने 86 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत एकूण 746 धावा केल्या आणि 97 विकेट्स मिळवल्या आहेत.

आणखी वाचा 

ICC ODI Rankings: शतक ठोकलं अन् रँकिंग ढवळून निघाली, विराटच्या स्फोटक खेळीनंतर ICC ची टॉप-5 रँकिंग बदलली; कोण कुठल्या क्रमांकावर?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On Ajit Pawar 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अजित पवारांना अमोल मिटकरांचं भावनिक पत्र
Sunil Tatkare PC : विलिनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यावर पक्षांतर्गत चर्चा करु, तटकरेंची भूमिका
NCP Merger : विलिनीकरणाचा फायदा, तोटा कुणाला? राष्ट्रवादींची गणितं कधी सुटणार?
Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
Embed widget