IPL 2026 Auction 3 Players Banned : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या मिनी लिलावाला आता फारसा वेळ नाही. या हंगामातील लिलाव 16 डिसेंबर रोजी अबू धाबी येथे होणार आहे. यावेळी एकूण 1355 खेळाडूंनी नोंदणी केली असून 77 स्लॉटसाठी बोली लागणार आहे. यापैकी 31 स्लॉट विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत. आंद्रे रसेल, ग्लेन मॅक्सवेल, मोईन अली, फाफ डु प्लेसिस, रविचंद्रन अश्विन आणि मोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांनी लिलावापूर्वीच आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तर काही खेळाडूंना बीसीसीआयने थेट बंदी घातली आहे.

Continues below advertisement

बीसीसीआयचे कडक नियम

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी बीसीसीआयने विदेशी खेळाडूंवर काही कठोर नियम लागू केले, ज्यामुळे फ्रँचायझींना नुकसान होऊ नये आणि लीगची प्रतिष्ठा कायम राहावी.

Continues below advertisement

पहिला नियम : प्रत्येक विदेशी खेळाडूने मेगा लिलावासाठी अनिवार्यपणे नोंदणी करणे आवश्यक. जर एखाद्या खेळाडूने नोंदणी केली नाही, तर तो पुढील वर्षीच्या मिनी लिलावातूनही बाहेर राहील.

दुसरा नियम : दुखापत किंवा वैद्यकीय कारणांशिवाय जर एखादा खेळाडू लिलावात विकत घेतल्यानंतरही हंगाम सुरू होण्यापूर्वी माघार घेत असेल, तर त्याला संपूर्ण दोन हंगामांसाठी लिलाव आणि टूर्नामेंट दोन्हीमधून बंदी घालण्यात येईल. या नियमांमुळे अनेक दिग्गज इंग्लिश खेळाडूंना आयपीएल 2026 च्या मिनी लिलावातून बाहेर व्हावे लागले आहे.

बेन स्टोक्स

इंग्लंडचा कसोटी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने 2025 मेगा लिलावासाठी नोंदणीच केली नाही. फिटनेस सांभाळण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय करिअर अधिक काळ टिकवण्यासाठी वर्कलोड मॅनेजमेंट आवश्यक असल्याचे त्याने सांगितले होते. 2024 मध्येही त्याने आयपीएल खेळणे टाळले होते.परिणामी आता तो आयपीएल 2026 च्या मिनी लिलावासाठी पात्र राहणार नाहीत, म्हणजेच संपूर्ण आयपीएल सायकल (2025–27) मधील मोठा भाग तो गमावतील.

हॅरी ब्रूक

इंग्लंडच्या व्हाईट-बॉल टीमचा कर्णधार आणि विश्वासार्ह मिडल ऑर्डर फलंदाज हॅरी ब्रूक याने 2024 मध्ये आजीच्या निधनामुळे आयपीएलमधून माघार घेतली होती. 2025 मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याला 6.25 कोटी रुपयांना खरेदी केले, पण इंग्लंड करिअरला प्राधान्य देत त्याने पुन्हा एकदा स्पर्धेतून माघार घेतली. त्याने सलग दुसऱ्यांदा माघार घेतल्यामुळे नव्या नियमांनुसार तो आयपीएल 2026 लिलावातून प्रतिबंधित झाले आहेत. यामुळे दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला, कारण ब्रूकला तो महत्त्वाच्या परदेशी स्लॉटसाठी मुख्य पर्याय मानत होते.

जेसन रॉय

इंग्लंडचा धडाकेबाज ओपनर जेसन रॉय याने 2024 मध्ये वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल सोडली होती. 2025 मेगा लिलावासाठी त्याने नोंदणीच केली नाही, त्यामुळे तो थेट 2026 मिनी लिलावातून बाहेर झाला. रॉय पूर्वी KKR संघाचा भाग राहिला आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे अनेक फ्रँचायझींना ओपनिंग स्लॉटसाठी नवीन पर्याय शोधावे लागणार आहेत, कारण रॉय आपल्या आक्रमक आणि स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो.

हे ही वाचा -

Hardik Pandya - Mahieka Sharma : हार्दिक पांड्या संतापला! गर्लफ्रेंड माहिका शर्माचा नको त्या अँगलने व्हिडिओ शूट; वांद्रेतील हॉटेल बाहेर नेमकं काय घडलं?, Video आला समोर