IPL Auction 2025 Live Streaming : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या आगामी हंगामासाठी मेगा लिलाव जेद्दाह सौदी अरेबिया येथे 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी लिलावासाठी निवडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. या लिलावादरम्यान प्रत्येक फ्रँचायझी जास्तीत जास्त 25 खेळाडूंना घेऊ शकते आणि यंदा एकूण 204 खेळाडू लिलावातून खरेदी करू शकतात.
या लिलावादरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामनाही होणार आहे. अशा परिस्थितीत ब्रॉडकास्टरच्या विनंतीनंतर बीसीसीआयने लिलावाच्या वेळेत बदल केला आहे. खरंतर, भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचे आणि आयपीएल लिलावाचे प्रसारण हक्क एकाच वाहिनीकडे आहेत.
IPL 2025 मेगा लिलाव कुठे होईल?
आयपीएल 2025 चा मेगा लिलाव रविवार (24 नोव्हेंबर) आणि सोमवार (25 नोव्हेंबर) रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे होणार आहे.
IPL मेगा लिलाव किती वाजता सुरू होईल?
बीसीसीआयने लिलावाच्या वेळेत बदल केला आहे. 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणारा लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल आणि रात्री 10:30 पर्यंत चालेल. पहिल्या लिलावाची वेळ 3 वाजता ठरली होती.
भारतात IPL 2025 मेगा लिलाव कुठे पाहू शकता?
IPL 2025 मेगा लिलाव भारतातील स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर दुपारी 3 वाजल्यापासून थेट प्रक्षेपित केला जाईल.
आयपीएल लिलावाचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता?
तुम्ही Jio सिनेमावर आयपीएल 2025च्या खेळाडूंच्या लिलावाचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
लिलावादरम्यान, 10 फ्रँचायझींना एकत्रितपणे 204 खेळाडूंवर खर्च करण्यासाठी सुमारे 641.5 कोटी रुपये असतील. या 204 स्लॉटपैकी 70 स्लॉट परदेशी खेळाडूंसाठी राखून ठेवलेले आहेत. आतापर्यंत 10 फ्रँचायझींनी 558.5 कोटी रुपये खर्च करून 46 खेळाडूंना कायम ठेवले आहे.
हे ही वाचा -