(Source: Poll of Polls)
Indian Womens Team Celebration ICC World Cup 2025: आयसीसी विश्वचषक जिंकताच भारतीय महिला संघाचं नव्या स्टाईलनं सेलिब्रेशन; रोहित शर्माही पाहत बसला, धमाकेदार VIDEO
Indian Womens Team Celebration ICC World Cup 2025: आयसीसी महिला विश्वचषक जिंकल्यानंतर भारताच्या महिला क्रिकेट संघाने मैदानात जोरदार सेलिब्रेशन केले.

Indian Womens Team Celebration Video ICC World Cup 2025: नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या महिला विश्वचषक 2025 फायनलमध्ये (Womens World Cup Final 2025) भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव (Ind W vs SA W) करून पहिला विश्वविजेता बनला. विजेतेपद जिंकल्यानंतर, भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur), इतर खेळाडूंप्रमाणे, स्वतःला आवरू शकली नाही. विजयानंतर भावनिक झालेल्या हरमनप्रीतने स्मृती मानधनाला मिठी मारली. नंतर, तिने भांगडा नृत्य सादर केले.
📽️ Raw Reactions
— BCCI Women (@BCCIWomen) November 3, 2025
Pure Emotions ❤️
The moment when #WomenInBlue created history by winning the #CWC25 Final 🥳#TeamIndia pic.twitter.com/5jV4xaeilD
आयसीसी विश्वचषक जिंकल्यानंतर भारताच्या महिला क्रिकेट संघाने मैदानात जोरदार सेलिब्रेशन (Indian Womens Team Celebration Video) केले. सर्व खेळाडूंसह संघाचे सर्व प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ यांनी मैदानात येत एकमेकांना मिठी मारल्या. दरम्यान, आयसीसीचे अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांच्याकडून भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्वचषकाची ट्रॉफी देण्यात आली. जय शाह यांच्याकडून ट्रॉफी मिळाल्यानंतर हरमनप्रीत कौर नव्या स्टाईलनं अॅक्शन करत ट्रॉफी घेऊन इतर भारतीय खेळाडूंकडे गेली आणि ट्रॉफी उंचावली. यावेळी मैदानात भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) उपस्थित होता. रोहित शर्मानेही भारतीय महिला खेळाडूंचं सेलिब्रेशन पाहिले. (Indian Womens Team Celebration ICC World Cup 2025)
THE MOST AWAITED VIDEO. 😍🇮🇳
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 2, 2025
- Team India lifting the World Cup Trophy. 🏆
pic.twitter.com/7NE2HapATT
विश्वचषक जिंकणाऱ्या भारताला किती रुपयांचं बक्षीस? (Womens World Cup Final 2025 Prize Money)
आयसीसी महिला विश्वचषक जिंकल्यानंतर आयसीसीकडून भारतीय महिला संघाला 4.48 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनेनूसार 40 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. महिला क्रिकेटच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे. उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेनेही स्पर्धेत अपवादात्मक कामगिरी केली. पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिकेलाही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला उपविजेता म्हणून 2.24 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनेनूसार 20 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.उपांत्य फेरीतील संघांना (ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड) 9.89 कोटी रुपये बक्षिस म्हणून मिळाले. पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील संघांना 6.2 दशलक्ष, 7व्या आणि 8व्या स्थानावरील संघांना 2.47 दशलक्ष आणि सर्व सहभागी संघांना प्रत्येकी 2.2 दशलक्ष रुपये मिळाले. गट टप्प्यातील विजयांना प्रत्येक सामन्यासाठी 3.02 दशलक्ष रुपये बक्षिसे देण्यात आली.
भारत-दक्षिण अफ्रिकेचा अंतिम सामना कसा राहिला? (India W vs South Africa W Final Match)
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 7 बाद 298 धावा केल्या. शेफाली वर्मा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज ठरली. तिने 78 चेंडूत 87 धावा केल्या, ज्यात 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. शेफालीने मानधना (45) सोबत 104 धावांची सलामी भागीदारी केली. दीप्ती शर्मानेही 58 चेंडूत 58 धावा केल्या, रिचा घोषने 24 चेंडूत 34 धावा केल्या, जेमिमाह रॉड्रिग्जने 24 आणि हरमनप्रीत कौरने 20 धावा केल्या. भारताच्या 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज लॉरा वोल्वार्डने शतक केले. लॉरा वोल्वार्डने 98 चेंडूत 101 धावा केल्या, ज्यात 11 चौकार आणि 1 षटकार होता. तर अॅनेरी डिर्कसेनने 35, सन लुसने 25 आणि तंजीम ब्रिट्सने 23 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताकडून दीप्ती शर्माने सामना फिरवून टाकणारी गोलंदाजी केली. दीप्ती शर्माने उजव्या हाताच्या फिरकीपटूने 9.3 षटकांत 39 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या. शेफाली वर्माने दोन आणि श्री चरणीने एक विकेट घेतली.
















