India vs West indies 5th T20 Match : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्याच्या टी-20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आज (रविवार, 13 ऑगस्ट) होणार आहे. सध्या दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात भारताने सलग विजय मिळवत कमबॅक केले. चौथा टी-20 सामना भारताने 9 गडी राखून जिंकला. आता पाचव्या सामन्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. या सामन्यासाठी टीम इंडिया कदाचित प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार नाही.
चौथ्या सामन्यात भारतासाठी यशस्वी जायस्वाल आणि शुभमन गिल यांनी दमदार सलामी दिली. दोघांनीही चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. यशस्वीने नाबाद 84 धावा केल्या होत्या. शुभमनने 77 धावांची खेळी केली होती. त्यामुळे निर्णायक सामन्यात भारत या दोन्ही फलंदाजांना संधी देऊ शकतो. चौथ्या सामन्यात संजू सॅमसनला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण त्याआधीही तो T20 मध्ये काही खास करू शकला नाही. पण संजूला अखेरच्या सामन्यात संधी मिळण्याचीच शक्यता आहे.
तिलक वर्माने आतापर्यंत आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलेय. दुसऱ्या टी 20 सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले होते. तर पहिल्या सामन्यातही चमकदार कामगिरी केली होती. तिसऱ्या सामन्यात त्याने नाबाद 49 धावांची खेळी केली. गल-यशस्वीच्या धमाकेदार फलंदाजीमुळे चौथ्या सामन्यात तिलक वर्माला संधी मिळाली नव्हती. पाचव्या सामन्यातही तिलक याला संधी मिळू शकते. या सामन्यात तिलक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव देखील प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतात. अर्शदीप सिंहने गेल्या सामन्यात 3 बळी घेतले होते. निर्णायक सामन्यात तो महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मुकेशलाही या सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे भारतीय संघात बदलाची शक्यता नाहीच.
भारत आणि वेस्ट इंडिज हेड टू हेड -
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आतापर्यंत 29 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 19 सामने जिंकलेत तर विडिंजला नऊ सामन्यात विजय मिळालाय. एका सामन्याचा निकाल लागला नाही.
भारताची संभाव्य प्लेईंग 11 :
यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार
वेस्ट इंडिजच्या संघात कोण कोणते शिलेदार ?
ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोवमन पॉवेल (कर्णधार), शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, अकील होसेन, ओबेड मैकॉय