India vs USA Warmup Match T20 World Cup 2026 : 2026 टी-20 वर्ल्ड कपच्या वॉर्म-अप सामन्यात भारताने अमेरिकेचा 38 धावांनी पराभव करत जबरदस्त कामगिरी केली. नवी मुंबईत झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 238 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तर अमेरिकेचा संघ 200 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

Continues below advertisement

प्रियांश आर्य अन् एन. जगदीशनचा तांडव  

Continues below advertisement

भारतीय संघाची सुरुवात प्रियांश आर्य आणि एन. जगदीशन यांनी आक्रमक पद्धतीने केली. प्रियांश आर्यने 28 धावांची आक्रमक खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, या सामन्यात खरा शो जगदीशनने केला. त्याने अवघ्या 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि 49 चेंडूत शतक झळकावत अमेरिकन गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. जगदीशनने 104 धावांची शानदार शतकी खेळी केली. विशेष म्हणजे तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळलेला माजी खेळाडू आहे.

तिलक वर्माचा कमबॅक, CSKच्या माजी स्टारची धुमाकूळ

या सामन्यात तिलक वर्मानेही दमदार पुनरागमन करत टी-20 वर्ल्ड कपपूर्वी आपली फिटनेस सिद्ध केली. तिलकने 24 चेंडूत 38 धावांची उपयुक्त खेळी केली. विजय हजारे ट्रॉफीदरम्यान हैदराबादकडून खेळताना त्याला दुखापत झाली होती, मात्र आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे दिसून आले. फलंदाजीसोबतच त्याने गोलंदाजीही केली, एका षटकात 15 धावा देत एक विकेट घेतली.

भारतीय संघाचे नेतृत्व आयुष बडोनीकडे होते. त्यानेही फलंदाजीत आक्रमक खेळ करत अमेरिकन गोलंदाजांना चांगलाच धक्का दिला. बडोनीने 26 चेंडूत 60 धावांची तुफानी खेळी केली, ज्यात 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. गोलंदाजीत भारताकडून रवी बिश्नोई सर्वाधिक प्रभावी ठरला, त्याने 3 विकेट्स घेतल्या. 

हे ही वाचा -

IND vs PAK :  फायनलमध्येही भारताविरुद्ध खेळणार नाही,  पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांचा दावा, टी 20 वर्ल्ड कपमध्ये काय घडणार?